---Advertisement---

जर आरसीबीने ‘ही’ गोष्ट केली असती, तर आज कोहली नव्हे धोनी असता संघाचा कर्णधार

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 6:39 PM
---Advertisement---

जगप्रसिद्ध टी२० स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगचा श्रीगणेशा २००८ मध्ये झाला होता. आयपीएलच्या या पहिल्याच हंगामाच्या लिलावातील सर्वात मोठे नाव होते, एमएस धोनी याचे. धोनीने आयपीएलची सुरुवात होण्याच्या जवळपास एका वर्षापुर्वी म्हणजेच २००७ मध्ये भारताला पहिला टी२० विश्वचषक जिंकून दिला होता. त्यामुळे आयपीएल २००८ मध्ये त्याच्यासाठी सर्वात महागडी बोली लावण्यात आली होती. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला एक चूक भोवली आणि धोनीसारखा दिग्गज त्यांच्या हातून सुटला. यासंदर्भात रिचर्ड मेड्ले यांनी माहिती दिली आहे.

आयपीएल २००८ मध्ये धोनीला आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी सर्व सहभागी फ्रँचायझींमध्ये चढाओढ चालू होती. केवळ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स त्याला विकत घेण्यासाठी जास्त उत्सुक नव्हते. परंतु शेवटी चेन्नई संघानेच सर्वात मोठी बोली लावत तब्बल ९ कोटी ५० लाख रुपयांना धोनीला विकत घेतले होते.

२००८ ते २०१८ पर्यंत आयपीएलचे लिलावकर्ता असणारे रिचर्ड मेड्ले याविषयी बोलताना म्हणाले की, “बेंगलोर संघानेही धोनीसाठी बोली लावली होती. परंतु त्यांनी सुरुवातीला खूप कमी रक्कम सांगितली. यासह आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असणाऱ्या धोनीला त्यांनी गमावले. मला वाटते की, नक्कीच त्यांना नंतर धोनीला विकत न घेतल्याचा या गोष्टीचा पश्चाताप झाला असावा.”

विराट कोहली कर्णधार असलेल्या बेंगलोरने धोनीला खरेदी करण्याच्या निर्णयातून का माघार घेतली?, याविषयी बेंगलोर संघाच्या माजी मुख्य कार्यकारी चारू शर्मा यांनीही उलगडा केला होता. त्यांनी सांगितले होते की, “धोनीसाठी एकाहून एक रक्कमेची बोली लावली जात होती. अशावेळी आम्ही या गोष्टीचा विचार केली की, क्रिकेटचा खेळ हा एकट्यावर अवलंबून नसतो. हा एक सांघिक खेळ आहे. जर धोनी पहिल्याच हंगामात सपशेल फ्लॉप ठरला असता, तर सर्वात महागड्या किंमतीला विकत घेणाऱ्या संघावर चाहत्यांनी टीका केली असती.”

आयपीएलच्या पहिल्या हंगामात प्रत्येक फ्रँचायझीला एका दिग्गज खेळाडूला निवडण्याची मुभा देण्यात आली होती. नियमांनुसार, या खेळाडूंना १० टक्के अधिक रक्कम द्यायची होती. त्यावेळी बेंगलोर संघाने दिग्गज खेळाडूच्या रुपात राहुल द्रविड याची निवड केली होती. कदाचित याही कारणामुळे त्यांनी धोनीला निवडले नसावे.

धोनीच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, आजवर दर आयपीएल हंगामात रिटेन करण्यात येणाऱ्या खेळा़डूंमध्ये धोनीचे नाव सर्वात वर असल्याचे दिसून आले आहे. २००८ पासून धोनी चेन्नई संघाचा कर्णधार आहे. आजवर धोनीने २०४ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान १९७ सामन्यात चेन्नईचे नेतृत्त्व करताना त्याने संघाला ११९ सामने जिंकून दिले आहेत. सोबतच तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“SENA देशात मीच सर्वोत्कृष्ट भारतीय फिरकीपटू”, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीनंतर अश्विनने केली स्वत:चीच प्रशंसा

केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही रुटची कमाल! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर

शाकिब अल हसनची अनोख्या विक्रमाला गवसणी, ‘ही’ कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---