जमैकाचा माजी धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलमध्ये भविष्य आजमावणार आहे. बोल्ट ऑस्ट्रेलियातील सेंट्रल कोेस्ट मरिनर्स या क्लबसाठी ट्रायल देणार आहे. याची माहिती सेंट्रल कोेस्ट मरिनर्स क्लबच्या सुत्रांनी मंगळवारी (17 जुलै) दिली.
उसेन बोल्ट 8 वेळचा ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता आहे. उसेन बोल्ट गेल्या वर्षी इंग्लंमध्ये झालेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या शर्यतीत सहभागी झाला होता.
व्यावसायीक फुटबॉल खेळण्याचे स्वप्न असलेला बोल्ट मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचा चाहता आहे. उसेन बोल्टने गेल्या महिन्यात नॉर्वेजियन स्टॉर्मगॉट फुटबॉल क्लबकडून प्रशिक्षण घेतले आहे.
“उसेन बोल्टने पुढच्या महिन्यात होणारी ट्रायल लक्षात घेउन संपूर्ण तयारी केली आहे. या सहा आठवडे चालणाऱ्या ट्रायलमध्ये जर बोल्टची कामगिरी चांगली झाल्यास त्याला आम्ही आमच्या क्बबमध्ये समाविष्ट करणार आहोत.” असे सेंट्रल कोेस्ट मरिनर्स क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शॉन मिलकॅम्प यांनी सांगितले.
उसेन बोल्टने यापूर्वीही युरोपियन फुटबॉल क्लबसाठी ट्रायल दिली आहे. मात्र त्यामध्ये तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनीच्या या कृत्यामुळे, निवृत्तीच्या चर्चेने धरला जोर
-विरेंद्र सेहवागने दिला टीम इंडियाला आधार, ट्विट करुन जिंकली करोडो चाहत्यांची मने