न्यूझीलंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू जॉन एफ रीड यांचे आज निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रीड हे बऱ्याच काळापासून आजारी होते.
जॉन एफ रीड हे ८०च्या दशकातील न्यूझीलंड संघाचा एक महत्वाचा भाग होते. न्यूझीलंडच्या संघाकडून खेळलेल्या १९ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ६ शतके ठोकली. त्यांची ४६च्या सरासरीने आपल्या कारकिर्दीत १२९६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सगळ्यात जलद १००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ते अव्वल स्थानावर आहेत.
न्यूझीलंडने १९८५ साली पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवलेल्या मालिका विजयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. विशेषतः नोव्हेंबर १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात त्यांनी मारलेले शतक वैशिष्ट्यपूर्ण होते. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या रीड यांनी १०८ धावांची खेळी करताना मार्टिन क्रो यांच्यासोबत तिसऱ्या गड्यासाठी २२५ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. मार्टिन क्रो यांनी १८८ धावांची खेळी केली होती. त्यामुळे न्यूझीलंडने ५५३ धावांचा डोंगर उभारत एक डाव आणि ४१ धावांनी ऑस्ट्रेलियाचा परभव केला होता.
१९७९ साली पदार्पण केलेल्या जॉन रीड यांनी १९८६ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यांच्या निधनावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– ब्रेकिंग! सिडनीतच होणार तिसरा कसोटी सामना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
– बीसीसीआयमुळे भंगल युवराजचं पुन्हा क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, या टूर्नामेंटद्वारे करणार होता पुनरागमन