आयपीएल २०२२ हंगामातील जवळपास आर्ध्यापेक्षा जास्त सामने खेळले गेले आहेत. अशात चाहते आणि क्रिकेटचे जाणकार स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीविषयी भविष्यवाणी करू लागले आहेत. न्यूझीलंड आणि आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार डॅनियल विटोरीनेही देखील प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांची नावे सांगितली आहेत.
आयपीएच २०२२ (IPL 2022) हंगाम २६ मार्च रोजी सुरू झाला आहे आणि स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक डॅनियल विटोरीच्या मते राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे चार संघ आहेत जे आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान बनवू शकतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माध्यमांतील वृत्तानुसार, मुलाखती डॅनियल विटोरी (Daniel Vettori) म्हणाला की, “राजस्थान आणि आरसीबीव्यतिरिक्त यावर्षी सहभागी झालेले दोन्ही संघही यामध्ये आहेत. मला वाटते की, या संघांनी हे स्थान गाठण्यासाठी आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. या संघांचे उत्कृष्ट नियोजन त्यांना तिथपर्यंत पोहोचवेल.”
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसन कर्णधार असलेल्या राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे प्रदर्शन आतापर्यंत सर्वोत्तम राहिले आहे. या दोन्ही संघांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची पूर्ण शक्यता देखील आहे. राजस्थानने हंगामातील सुरुवातीच्या ८ सामन्यांपैकी प्रत्येकी ६ सामने जिंकले आहेत, तर गुजरातने ७ सामन्यांपैकी ६मध्ये विजय मिळवला आहे. गुणतालिकेत दोन्ही संघांकडे प्रत्येकी १२ गुण आहेत, पण नेट रनरेटच्या जोरावर राजस्थान पहिल्या, तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे.
असे असले, तरी लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांमध्ये प्लऑफ फेरीसाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे. सध्या कोणता संघ प्लेऑफमध्ये जागा बनवू शकतो, हे सांगणे कठीण आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबादने चालू हंगामातील सुरुवातीच्या ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत आणि त्यांचा संघ १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे केएल राहुल कर्णधार असलेला लखनऊ सुपर जायंट्स संघ. राहुच्या नेतृत्वात संघाने त्यांच्या सुरुवातीच्या ८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. यादीत पाचव्या क्रमांकावर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने त्यांच्या सुरुवातीच्या ९ सामन्यांपैकी ५मध्ये विजय मिळवला आहे. आरसीबीकडे सध्या १० गुण आहेत. अशा परिस्थितीत प्लेऑफचे चित्र स्पष्ट होण्यासाठी पुढचे काही सामने महत्वाचे ठरणार आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
समालोचन सोडून इंग्लंडचे प्रशिक्षक बनणार का रवी शास्त्री? म्हणाले, ‘आता हा रस्ता ओलांडून…’
‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा