दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 115 धावांचे आव्हान पार करायचे होते. हे आव्हान भारताने तिसऱ्या दिवशी चहाचा ब्रेक होण्यापूर्वीच गाठत मालिकेतील दुसरा सामनाही खिशात घातला. भारताचा विजय झाला असला, तरीही सध्या केएल राहुल याचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. राहुलने दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून फक्त 18 धावा केल्या. त्यापूर्वी नागपूर कसोटीतही राहुल खास कामगिरी करू शकला नव्हता. अशात राहुलबद्दल भारतीय संघाचे दो दिग्गज एकमेकांना भिडले आहेत.
माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने 18 फेब्रुवारी रोजी एका पाठोपाठ एक ट्वीट केले. त्यात त्याने लिहिले की, “आणखी खराब फॉर्म सुरू आहे. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूसोबत खेळणे हे संघ व्यवस्थापनाची कमतरता दाखवून देतो. भारतीय क्रिकेटच्या कमीत कमी 20 वर्षांमध्ये कोणत्याही अव्वल क्रमांकावरील फलंदाजाने इतक्या कमी सरासरीसोबत इतके कसोटी सामने खेळले नाहीयेत.”
And the torrid run continues. More to do with rigidity of the management to persist with a player who just hasn’t looked the part. No top order batsman in atleast last 20 years of Indian cricket has played these many tests with such a low average. His inclusion is …. https://t.co/WLe720nYNJ
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 18, 2023
पुढे बोलताना ते ट्वीटमध्ये म्हणाले की, “प्रतिभावान खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची संधी मिळत नाहीये. शिखरची कसोटी सरासरी 40हून अधिक होती, मयंकची 41हून अधिक होती, त्यात 2 द्विशतकही होते. शुबमन गिल शानदार फॉर्मात आहे. सरफराजही कधीही न संपणारी प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे अनेक घरगुती सामन्यांतील कामगिरीकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे.”
deliberately denying talented guys, in form guys an opportunity to be in the 11.
Shikhar had a test avg of 40+ , Mayank has of 41+ with 2 double hundreds, Shubhman Gill in sublime form, Sarfaraz never ending wait.. Many domestic performances constantly ignored. His inclusion is…— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 18, 2023
“तो संघात असल्याने न्यायावरचा विश्वास उडतो. एसएस दास आणि सदागोपन रमेश यांच्यात खूप क्षमता होती. त्यामुळे त्यांची सरासरी 38हून अधिक होती. मात्र, 23 कसोटी सामन्यांपेक्षा जास्त सामने ते खेळू शकले नाहीत. राहुलचे सातत्याने खेळणे भारतात फलंदाजांतील प्रतिभा कमी असल्याचे दिसते, जे खरे नाहीये. मागील 5 वर्षांमध्ये 47 डावांमध्ये त्याची सरासरी 27पेक्षा कमी आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
His inclusion shakes belief in Justice. SS Das had great potential,so did S Ramesh,both avgd 38+but did not get beyond 23 test matches. Rahul’s consistent inclusion gives an impression of lack of batting talent in India which isn’t true. Last 5 years his avg is below 27 in 47 inn
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 18, 2023
“माझ्या मते, तो सध्या भारताच्या 10 सर्वोत्तम सलामी फलंदाजांपैकी नाहीये. मात्र, त्याला सातत्याने संधी दिली जात आहे. कुलदीप यादव याच्यासारख्या खेळाडूने सामनावीर कामगिरी केली आणि पुढच्याच सामन्यातून त्याला वगळले. राहुल कोणत्याच प्रकारे हुकमी एक्का नाहीये,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
As per me ,he is currently not amongst the current 10 best opener’s in India but is being given endless chances. Guys like Kuldeep Yadav put in man of the match performances and next game are dropped with theories like Horses for courses. In any course ,KL is not a horse. Sad
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 18, 2023
आकाश चोप्राचे प्रत्युत्तर
यानंतर आकाश चोप्रा (Akash Chopra) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर वेंकटेश प्रसाद याला प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला की, “जसा केएल राहुल स्वस्तात बाद होतो, तो ट्विटरवर ट्रेंड करू लागतो. प्रत्येकाला मत मांडायचे आहे आणि त्याच्यावर टीका करायची आहे. मला वाटते की, वेंकटेश प्रसादच्या ट्वीटने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. तो एक माजी खेळाडू आहे आणि त्याला माहिती पाहिजे की, एक डाव शिल्लक असताना आपण चालू सामन्यात आपल्याच खेळाडूवर टीका केली नाही पाहिजे. खेळानंतर तुम्ही निश्चितरीत्या कोणत्याही खेळाडूबाबत बोलू शकतो आणि तुमचे मत मांडू शकता.”
आकाश चोप्राने वेंकटेशच्या एका ट्वीटचेही उत्तर देत म्हटले की, “वेंकी भाई, कसोटी सामना सुरू आहे. कमीत कमी दोन डाव संपण्याची वाट पाहणे कसे राहील. आपण सर्वजण एकाच संघाकडून म्हणजेच भारताकडून आहोत. तुम्हाला तुमचे विचार परत घेण्यास सांगत नाहीये, परंतु वेळ चांगली होऊ शकते. शेवटी आपला खेळ हा वेळेचाच आहे.”
Venky Bhai, Test match chal raha hai. How about, at least, waiting for both the innings to get over. All of us are in the same team i.e. Team India. Not asking you to hold back your thoughts but timing could be a little better. After all, our game is all about the ‘timing’ 🙏 https://t.co/HvxtRQxQDn
— Aakash Chopra (@cricketaakash) February 19, 2023
यानंतर आकाश चोप्राला प्रत्युत्तर देत प्रसादने लिहिले की, “प्रामाणिकपणे काहीच फरक पडत नाही, आकाश. माझ्यामते, ही खूपच योग्य टीका आहे मग त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक का करेना. सामन्यामध्ये किंवा खेळ संपल्यानंतर हे अयोग्य आहे. युट्यूबवर तुझ्या चांगल्या व्हिडिओंसाठी शुभेच्छा. मी त्यांचा आनंद घेतो.”
Honestly doesn’t matter , Aakash. In my view it is very fair criticism even if he scores a half century in the second innings . And between the match or after the match is irrelevant here. Best wishes for your lovely videos on YT, i do enjoy them. https://t.co/bkVGSEeg5w
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) February 19, 2023
केएल राहुलची आकडेवारी
सन 2022च्या सुरुवातीपासून केएल राहुल याने 11 कसोटी डावात फक्त 175 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही 15.90 इतकी राहिली आहे. त्याने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत नेतृत्व केले होते. त्याने एकूण 47 सामने खेळूनही त्याची कसोटी सरासरी ही फक्त 33.44 इतकीच आहे. (former opener aakash chopra and venkatesh prasad engage in twitter war over kl rahul know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी धावसंख्या न करताही रोहितच्या नावावर भन्नाट विक्रमाची नोंद, सचिन-हेडनच्या यादीत गाठले तिसरे स्थान
स्वतःची 100वी कसोटी खेळताना पुजाराने मिळवून दिली विजय, याआधी अशी कामगिरी करणारे फक्त…