भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा याने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एक खास कारनामा केला. त्याने या सामन्यात 48 चेंडूत सर्वाधिक 53 धावा केल्या. यादरम्यान त्याने कसुन रजिथा याच्या गोलंदाजीवर षटकार खेचला, यामुळे तो वनडे क्रिकेट कारकीर्दीतील 10000 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. आता रोहितने हा मैलाचा दगड पार करताच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने माजी कर्णधार एमएस धोनी याचे कौतुक केले आहे.
‘एमएस धोनीमुळे आज रोहित शर्मा हा रोहित शर्मा आहे’
तसं पाहिलं, तर गौतम गंभीर (Gautam Gambhir) नेहमीच एमएस धोनी (MS Dhoni) याच्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर असतो. मात्र, त्याने नुकतेच रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी केलेल्या विधानामुळे धोनीचे चाहते त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत. कारण, गंभीरने रोहितच्या यशासाठी धोनीला श्रेय दिले आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात पावसामुळे ब्रेक घेतला गेला होता. यादरम्यान गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, “रोहित शर्मा हा आज धोनीमुळेच रोहित शर्मा आहे. धोनीने रोहितच्या संघर्षाच्या काळात त्याला सातत्याने पाठिंबा दिला होता.”
रोहितच्या संघर्षाच्या काळात धोनीचा भक्कम पाठिंबा
खरं तर, रोहित शर्मा याची कारकीर्द खूपच संथ गतीने आणि संघर्षाने भरलेली होती. तो वनडेत 2000 धावा करणारा चौथा भारतीय होता. मात्र, त्याने स्वत:वर काम केले आणि आज तो वनडेत सर्वात वेगवान 10000 धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. रोहितच्या कारकीर्दीत एवढा झपाट्याने बदल होण्यामागे फक्त एक व्यक्ती होता. तो म्हणजे, एमएस धोनी. धोनीने रोहितला संघर्षाच्या सुरुवातीच्या 6 वर्षात सातत्याने पाठिंबा दिला होता. त्यानंतर धोनीने रोहितला 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीला फलंदाजी करण्यास सांगितले होते. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही. (former opener Gautam Gambhir Credits MS Dhoni For Making Rohit Sharma’s Career)
हेही वाचा-
ही दोस्ती तुटायची नाय! श्रीलंकेविरुद्ध पाहायला मिळाला रोहित-विराटचा ब्रोमान्स; एकमेकांवर प्रेमाची उधळण- Video
Final गाठताच रोहितकडून एक विकेट घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचे कौतुक; म्हणाला, ‘असं वाटलं तो प्रत्येक बॉलवर…’