श्रीलंका संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील पाचव्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानला स्पर्धेचे किताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात होते. संघाने साखळी फेरीत गोलंदाजीने शानदार प्रदर्शन केले होते. सुपर- 4 फेरीतही बांगलादेशचा पराभव केला होता. मात्र, भारताविरुद्ध 228 धावांच्या आणि श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या चेंडूवरील पराभवाने पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकले. अशात पाकिस्तान बाहेर पडताच संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने निराशा व्यक्त केली.
काय म्हणाला अख्तर?
पाकिस्तान (Pakistan) संघ आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतून बाहेर पडताच शोएब अख्तर प्रतिक्रिया (Shoaib Akhtar Statement) घेऊन समोर आला. त्याने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “लाजीरवाणा पराभव, खरंच निराशाजनक, हा झोपेतून उठवणारा कॉल आहे.” अख्तरने या व्हिडिओत वेगवान गोलंदजा जमान खान याचे कौतुक केले.
तो म्हणाला, “तुम्ही सामना पाहिला आहे, पाकिस्तान स्पर्धेबाहेर झाला. जमानमुळे सामना चांगला झाला. या पोराने पीएसएलमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. शाहीननेही चांगली गोलंदाजी केली. मात्र, याचे श्रेय जमानला जाते. त्याने खूपच चांगली गोलंदाजी केली. पाकिस्तान अंतिम सामना खेळण्याचा हक्कदार होता. संपूर्ण जग पाकिस्तानला अंतिम सामना खेळताना पाहू इच्छित होती, पण पाकिस्तान स्पर्धेबाहेर झाला.”
Embarrassing loss. Really disappointed .
Wake up call guys!!! pic.twitter.com/qDtQWM7YJJ— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 14, 2023
अख्तर पुढे म्हणाला, “तुम्ही पाकिस्तान स्पर्धेबाहेर झाल्यामुळे खूप टीका करू शकता. दावेदार असूनही बाहेर पडला. दुर्दैवाने भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना कधीच होऊ शकत नाही. अंतिम सामना कधीच झाला नाही. ही एक संधी होती, पण श्रीलंका याची हक्कदार होती.”
श्रीलंका करणार भारताचा सामना
आशिया चषकात आजपर्यंत कधीच भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात अंतिम सामना खेळला गेला नाही. त्यामुळे यावेळीही चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. त्यामुळे आता भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर पार पडेल. (former pak cricketer shoaib akhtar statement after pakistan knocked out from asia cup 2023)
हेही वाचा-
पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताला ICC ODI Rankingsमध्ये मोठा फायदा, रोहितसेनेने पटकावला ‘हा’ क्रमांक
Finalचं तिकीट हुकताच खचून गेला बाबर, आपल्याच खेळाडूंवर काढला सगळा राग; म्हणाला, ‘म्हणून आम्ही हारलो…’