---Advertisement---

“युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता”, माजी पाकिस्तानी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा 

On: गुरूवार, जुलै 1, 2021 4:51 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघाचे माजी फलंदाज आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक युनिस खान हे गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भरपूर चर्चेत होते. याचे कारण असे की, त्यांनी फलंदाजी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, युनिस खान २०१६ मध्येही भरपूर चर्चेत आले होते. त्यावेळी चर्चेत येण्यामागचे कारण ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही. परंतु, त्याचा खुलासा स्वतः पाकिस्तानी संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर यांनी केला आहे.

युनिस खान यांनी पाकिस्तान संघासाठी १० हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ते पाकिस्तान संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहेत. परंतु ग्रांट फ्लॉवर यांनी युनिस खानबद्दल मोठा खुलासा करताना म्हटले आहे की, “२०१६ मध्ये युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता.”

ग्रांट फ्लॉवर यांनी ‘फॉलोइंग ऑन क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये म्हटले की, “ब्रिस्बेन कसोटी सुरू होती. मी नाश्ता करत असताना युनिस खानला सल्ला देण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याला माझा सल्ला आवडला नाही आणि त्याने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला.” हे प्रकरण सोडवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांना देखील हस्तक्षेप करावा लागला होता.(Former Pakistan batting coach reveals about Younis Khan)

ग्रांट फ्लॉवर यांना जेव्हा विचारण्यात आले होते की, तुमच्या प्रशिक्षक कारकिर्दीत तुम्हाला कशाप्रकारच्या खेळाडूंचा सामना करावा लागला होता. त्यावेळी, ग्रांट फ्लॉवर यांनी युनिस खानचा किस्सा सांगितला होता. त्यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान पाकिस्तान संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. तसेच त्यांनी शेवटी म्हटले की, “युनिस खान, त्याला शिकवणे खूप कठीण आहे.”

तसेच ग्रांट फ्लॉवर यांनी पुढे म्हटले की,”हो, खरंच खूप मनोरंजक होते. परंतु हा एक प्रशिक्षणाचा भाग आहे. त्यामुळेच हा प्रवास खूप कठीण झाला. परंतु, मी याचा खूप आनंद घेतला. मला आणखी खूप गोष्टी शिकायच्या आहेत. परंतु, मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मी इथपर्यंत पोहोचलो आहे.”

ही घटना २०१६ साली पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ब्रिस्बेनमध्ये घडली होती. त्यावेळी ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावात युनिस शुन्यावर तर दुसऱ्या डावात ६५ धावांवर बाद झाले होते. तसेच मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्यांनी १७५ धावांची खेळी केली होती. पण ही मालिका पाकिस्तानने ३-० अशी गमावली होती.

पाकिस्तान संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज
युनिस खान यांनी पाकिस्तान संघासाठी एकूण ११८ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ५२.०५ च्या सरासरीने १०,०९९ धावा केल्या होत्या. त्यांना पाकिस्तान क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते.

महत्वाच्या बातम्या –

भर सामन्यात कर्णधार विलियम्सनने सहकाऱ्यावर वटारले होते डोळे, स्वत: दिग्गजाने सांगितला किस्सा

भारताची धावपटू द्युती चंदचा आनंद द्विगुणित, खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनानंतर मिळालं ऑलिंपिकचं तिकीट

अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडविरुद्ध असणार रोहितचा सलामी जोडीदार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---