भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघ मोठ्या द्विधा स्थितीत फसला आहे. आता भारतीय संघाला नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली आयसीसी स्पर्धांमध्ये शानदार प्रदर्शन करावे लागणार आहे. अशात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याला असे वाटते की, भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक (Team India Coach) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासाठी हे मोठे आव्हान असणार आहे. त्यांना प्रशिक्षक म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने निशाराजनक प्रदर्शन केले आहे. तरीही अख्तरने द्रविडची बाजू घेत म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट कधीही खाली ढासळू शकत नाही. त्यांना स्थिती सांभाळावी लागणार आहे. राहुल द्रविडसमोर सध्या खूप मोठे आव्हान आहे. अपेक्षा करतो की, लोक असे म्हणणार नाहीत की, द्रविडला अतिशयोक्ती करत प्रशिक्षकाच्या रूपात समोर आणले गेले. त्याने रवी शास्त्रीची जागा घेणे साहजिक होते, पण भारतीय संघाचे प्रशिक्षकपद त्याच्यापुढील मोठे आव्हान असेल.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
विराट कोहलीवरही अख्तरने दिली प्रतिक्रिया
तसेच पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने विराट कोहलीबद्दलही आपले मत मांडले आहे. विराटने स्वत:हून कर्णधारपद सोडलेले नाही, तर त्याला नेतृत्त्व सोडण्यासाठी भाग पाडले गेले आहे. विराट एक महान क्रिकेटपटू आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. पण सहसा मोठी संकटे मोठ्या माणसांवरच येतात. त्यामुळे मी त्याच्यासाठी दु:खी आहे. विराटने या परिस्थितीतून बाहेर पडायला पाहिजे. त्याच्यासोबत जे काही घडले आहे, त्याला विसरून त्याने पुढे जायला हवे, असे त्याने म्हटले आहे.
द्रविड पहिल्या परदेशी दौऱ्यात नापास
दरम्यान प्रशिक्षकाच्या रूपात द्रविडचा पहिला परदेशी दौरा निराशाजनक राहिला आहे. भारतीय संघ द्रविडच्या प्रशिक्षणाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना ११३ धावांनी जिंकत भारतीय संघाने विजयी शुभारंभ केला होता. परंतु त्यानंतर पुढील सलग २ कसोटी गमावत भारतीय संघ २-१ ने या कसोटी मालिकेत पराभूत झाला. त्यानंतर वनडे मालिकेतही भारतीय संघाला खास प्रदर्शन करता आले नाही. सुरुवातीचे सलग २ सामने गमावत भारतीय संघाने ही मालिकाही आपल्या हातून गमावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पावसाचा खेळ! ऍशेसमधील दोन सामने रद्द; ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका
आयसीसीने केली वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला टी२० खेळाडूंची घोषणा; घ्या जाणून कोण आहेत मानकरी
हेही पाहा-