आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण त्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) सांगितले आहे. त्यावर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद (Javed Miandad) संतापला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) भारताच्या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे. पीसीबीनेही याची माहिती पाकिस्तान सरकारला दिली आहे.
पीटीआयच्या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, जावेद मियांदाद (Javed Miandad) म्हणाला की, “जे काही घडत आहे ते एक विनोद आहे. आपण भारताशी अजिबात खेळलो नाही तरी पाकिस्तान क्रिकेट टिकेलच पण त्याहूनही चांगल्या उदयास येईल. जसे आपण यापूर्वीही केले आहे. भारत-पाकिस्तान संघात स्पर्धा न करताही पैसा कसा कमावला जातो हे मला पाहायचे आहे.”
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) आयोजनाचे हक्क पाकिस्तानने घेतल्यापासून, भारतीय संघ तिथे दौरा करणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. याआधी 2023 साली पाकिस्तानला आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते, पण तरीही भारतीय संघाने तिथे जाण्यास नकार दिला होता. यानंतर भारताचे सामने श्रीलंकेत झाले होते. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही हायब्रीड मॉडेल सामने खेळवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये दरी निर्माण झाली. भारत आणि पाकिस्तान संघातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. तेव्हा पाकिस्तानने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली, तर टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येच भाग घेतात.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; अक्षर पटेल होणार दिल्लीचा नवा कर्णधार? मेगा लिलावापूर्वीच मोठा खुलासा
Border Gavaskar Trophy; रिषभ पंतला घाबरतो कांगारू संघ?
रोहितच्या जागी ‘हा’ खेळाडू देणार संघासाठी सलामी, गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं