भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने जेव्हा सलामीवीर फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा तो अगदी सचिन तेंडुलकरप्रमाणे फलंदाजी करत होता. त्याचे पॅड्स, ग्लोव्हज आणि उभे राहण्याची पद्धत अगदी सचिनप्रमाणेच होती.
जेव्हा सचिन (Sachin Tendulkar) आणि सेहवाग (Virender Sehwag) फलंदाजी करायचे, तेव्हा ओळखणे कठीण व्हायचे की, सचिन कोण आहे आणि सेहवाग कोण? असेच काहीसे पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफबरोबरही (Rashid Latif) झाले होते. त्याने सांगितले की, त्याने सेहवागला पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहिले, तेव्हा त्याला समजलेच नाही. त्याला वाटले की, सचिनच फलंदाजी करत आहे. परंतु तो सेहवाग होता.
“मला आठवते की, मी भारत आणि श्रीलंका संघाचा सामना पाहत होतो. मी पाहिले की, हा सचिनप्रमाणे फलंदाजी कोण करत आहे? तो सेहवाग होता. जो अगदी सचिनप्रमाणे हेल्मेट, पॅड्स आणि फलंदाजी करत होता. फरक फक्त एवढाच होता की, सेहवाग थोडासा जाड होता,” असे राशिदने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते
तो पुढे म्हणाला की, “तुम्ही सेहवागची तुलना त्याच्या आकडेवारीवरून करू शकत नाही. तो खूपच प्रभावी खेळाडू होता आणि सामना जिंकणाराही. सेहवागची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो निर्भय होता. त्याने ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, वसीम अक्रम, शोएब अख्तर यांसारख्या गोलंदाजांविरुद्ध निर्भय होऊन फलंदाजी केली आहे.”
सेहवागने १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तेव्हा तो मधल्या फळीतील फलंदाज होता. खराब कामगिरीमुळे त्याला काहीवेळा संघातून वगळण्यातही आले होते. त्यानंतर त्याने पुनरागमन केले आणि सौरव गांंगुलीने (Sourav Ganguly) आपल्या जागी त्याला सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी सोपविली होती.
त्याने आतापर्यंत वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये ८०००पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ३८ शतकांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयसीसीच्या त्या एका ट्विटने सचिनला आली ‘दादी’ची आठवण
-२००५ साली पदार्पण केलेला खेळाडू म्हणतोय, होय मला अजूनही टीम इंडियाकडून खेळायचं आहे
-एआर रेहमानच्या गाण्यावर थिरकला केपी, थेट रेहमाननेच केला व्हिडीओ शेअर