इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रॅंचायजींनी युनायटेड अरब अमिराती इंटरनॅशनल (आयएल टी२०) आणि दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. मुंबई इंडियन्सचा आयएल टी२०मध्ये एमआय एमिरेट्स हा संघ आहे. त्यांनी खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत. त्यामध्ये वेस्ट इंडिज, न्यूझीलंड अशा अनेक मोठ्या देशांतील खेळाडूंंचा समावेश आहे. मात्र यामध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूचे नाव नाही. यावरून पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बट याने मोठे वक्तव्य केले आहे.
आयएल टी२० आणि दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये भारताच्या अनेक फ्रॅंचायजींनी संघ विकत घेतले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना कशी संधी मिळणार यामागचे कारण सलमान बट (Salman Butt) याने स्पष्ट केले आहे.
सलमानने म्हटले, “या लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळतील याची आशा होती? मला तर नव्हती. ही काही अमिराती एयरलाइंस नाही जेथे कोणीही प्रवास करेल. कोणी संघ विकत घेतले आहेत? सर्वाधिक संघाचे मालक आयपीएल फ्रॅंचायजीचे आहेत मग ते पाकिस्तानच्या खेळाडूंना का घेतील यामध्ये आश्चर्यचकित होण्याची काही गरजच नाही.”
“आम्ही आधीही पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळली आहे. पुढेही ती खेळणार आहोत. तर बाकी लीगमध्ये खेळण्यास पाकिस्तान बोर्डची संमती नाही. यामुळे ही काही मोठी बाब नाही. मागील काही काळापासून भारत-पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धांमध्येच समोरासमोर येतात. तसेच ते कोणत्याही लीगमध्ये पाकिस्तान खेळाडूंची निवड करत नाही. यामुळे या दोन टी२० मधून कोणतीही आशा नव्हती,” असेही सलमानने पुढे म्हटले आहे.
“पाकिस्तानचे खेळाडू २००८च्या आयपीएलमध्ये खेळले होते. त्यानंतर पाकिस्तानने टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच आम्ही मागील विश्वचषक सामन्यात भारताचा पराभव केला आहे. यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही की आमचे खेळाडू त्या लीगमध्ये खेळले नाही तरी चालेल. तसेच क्रिकेटच्या दोन्ही प्रकारामध्ये चांगली कामगिरी करत आहोत,” असे सलमानने म्हटले आहे.
आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पाकिस्तान चौथ्या आणि टी२०मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून बुमराहच्या जागी शामीला संधी मिळाली नाही’, माजी दिग्गजाने सांगितले कारण
रोहितसोबतच्या दोस्तीवर बोलताना शिखर म्हणतो, “तो माझा…”
‘माझ्या हातात असते तर…’, धवनला नेतृत्त्वावरून हटवण्याच्या निर्णयाबद्दल माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया