बीसीसीआयने सोमवारी आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा केली. विराट कोहली आणि केएल राहुल या महत्वाच्या फलंदाजांना संघात पुनरागमन केले असले, तर जसप्रीत बुमराह मात्र आशिया चषक खेळणार नाहीये. बुमराह आणि हर्षल पटेल या दोन प्रमुख गोलंदाजांना दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. अशातच आता पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट याने बुमराह आणि भारतीय गोलंदाजी आक्रमाणाविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. आशिया चषकाच्या तोंडावर त्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. यावर्षीचा आशिया चषक यूएईत खेळवला जाणार असून एकूण ६ संघ यामध्ये सहभागी होतील. या सहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. भारत आणि पाकिस्तान मात्र एकाच ग्रुमध्ये आहेत, ज्यांचा पहिला सामना २८ ऑगस्टला असेल. या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी आशिया चषकाचा पहिला सामना खेळला जाईल.
सलमान बट (Salman Butt) त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “भारतीय संघाला आगामी आशिया चषकात जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवेल. मला वाटते की, बुमराहसारखा गोलंदाज संघात नसल्यामुळे खूप फरक पडतो. तो खूपच उत्कृष्ट गोलंदाज आहे, ज्याच्याकडे खूप अनुभव देखील आहे. शेवटच्या षटकांमध्ये तो असाधारण गोलंदाजी करतो आणि नवीन चेंडूने देखील चांगला प्रभाव पाडत असतो. तो एक मॅच विनर आहे, ज्याची कमी भारताला यूएईत जाणवेल.”
“भारताने त्यांच्या नवीन वेगवान गोलंदाजांना खूप संधी दिली आहे. सध्या ते खूप युवा आहेत, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यांच्यासाठी नवीन नाहीये. ते खूप क्रिकेट खेळत आहे आणि मला वाटते की, त्यांचा आत्मविश्वास एका वेगळ्याच पातळीवर असेल. माझ्या मते जसप्रीत बुमराह त्या सर्व वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, पण बाकीचे गोलंदाजही या मंचासाठी खूप नवखे नाहीत.”
आशिया चषकासाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘अर्शदीप सिंग ठरतोय आवेश खानपेक्षाही वरचंढ’, भारताच्या माजी दिग्गजाने केलाय दावा
‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट!’ एका वाक्यात दिग्गजाने केली विराटची पाठराखण
Asia Cup | यूएईत भारत नक्कीच बनू शकतो चॅम्पियन! मागच्या ३८ वर्षात कुणीच नाही दिली टक्कर