---Advertisement---

“विराटला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले”, माजी कर्णधाराचा मोठा आरोप

On: शुक्रवार, जून 16, 2023 4:57 PM
virat-kohli
---Advertisement---

भारतीय खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते मैदानातील आक्रमक स्वभावामुळे, तर कधी आपल्याच देशाच्या माजी खेळाडूशी असलेल्या वादामुळे सर्वांचे लक्ष वेधतात. जवळपास दोन वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि तत्कालीन कर्णधार विराट कोहली यांच्या दरम्यान असाच वाद झाला होता, असे दिसून येते. त्यानंतर विराटला नेतृत्व सोडावे लागले होते. आता याप्रकरणी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने एक महत्त्वाचे विधान केले आहे.

या प्रकरणावर आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बट म्हणाला,

“विराट एक यशस्वी कर्णधार होता. मात्र, त्याच्या आजूबाजूला अशी परिस्थिती बनवली गेली की, त्याला नाईलाजाने कर्णधारपद सोडावे लागले. आपल्याशी कोणीही चर्चा केली नव्हती असे विराटने स्वतः कबूल केले आहे.”

यापूर्वी देखील बट याने अनेकदा विराटला पाठिंबा देणारी वक्तव्य केल्याचे दिसून येते.

काय आहे संपूर्ण वाद?
विराट कोहली (Virat Kohli) याने टी20 विश्वचषक 2022 पूर्वी म्हटले होते की, तो टी20 कर्णधारपद सोडणार आहे. मात्र, त्याने असेही म्हटले होते की, त्याला कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व करत राहायचे आहे. मात्र, बीसीसीआय याविषयी सहमत नव्हती. त्यामुळे नंतर विराटकडून कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आले होते. बीसीसीआय त्याला तीनही संघाचा कर्णधार करण्यास अनुकूल होती. मात्र, विराट टी20 कर्णधार पद सोडण्यावर ठाम राहिल्याने अखेर त्याला दोन्ही प्रकारच्या संघाच्या कर्णधारपदावरून मुक्त केलेले. त्यानंतर काही दिवसातच त्याने कसोटी कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिलेला.

(Former Pakistan Captain Salman Butt Said BCCI Make Situation Which Virat Resign His Captaincy)

महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---