सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषक मध्ये सुपर-8 फेरीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावांची सर्वत्र चर्चा होत आहे. या दोघांनीही आपल्या कामगिरीने जगभरात आपला डोक वर काढले आहे. आणि यामुळेच या दोघांनाही जगाच्या कानाकोपऱ्यातून अशा कमेंट येत आहेत, ज्या या आधी कधीही पाहिल्या किंवा ऐकल्या नव्हत्या. आणि जेव्हा हे विधान पाकिस्तानच्या माजी कर्णधाराकडून येते तेव्हा त्याला खूप महत्त्व प्राप्त होते. आता बुमराहच्या गोलंदाजीने प्रभावित झालेल्या सानिया मिर्झाचा पती आणि माजी कर्णधार शोएब मलिकने बुमराहवर प्रतिक्रिया दिली आहे.
या कामगिरीनंतर बुमराहचे विविध खेळाडूंकडून कौतुक होत असले तरी, मलिकने जे सांगितले ते आतापर्यंतचे सर्वात मोठे कमेंट आहे, कारण त्याने बुमराहला विराट कोहलीशी जोडले आहे. मलिक म्हणाला, ‘बुमराह हा जगातील गोलंदाजीचा विराट कोहली आहे.’ मलिकचे हे काही शब्द इतर कोणत्याही खेळाडूने केलेल्या कौतुकाच्या बरोबरीचे आहेत.
Shoaib Malik said “Jasprit Bumrah is the Virat Kohli of Bowling in the World”. [Ten Sports] pic.twitter.com/Y8khTdNaDn
— Johns. (@CricCrazyJohns) June 21, 2024
बुमराहची आकडेवारीही शोएब मलिक काय म्हणत आहे याची पुष्टी करते असे दिसते. आता विराट कोहली फलंदाजीत विश्वविक्रमांचा मास्तर आहे, तर वेगवान गोलंदाजीत बुमराहबाबतही असेच म्हणता येईल. आता तुम्ही स्वतःच बघू शकता की बुमराहने टाकलेल्या 15 षटकांपैकी (अफगाणिस्तान सामन्यापर्यंत) 62 निर्धाव चेंडू (डॉट बॉल्स) झाले आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच वेळी, बुमराहचा इकॉनॉमी रन-रेट (3.46) जे की यंदाच्या विश्वचषकाच्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 12 गोलंदाजांमध्ये सर्वात कमी आहे.
महत्तवाच्या बातम्या-
भारतीय संघाचा नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मैदानाबाहेरही थालाचीच हवा! या कंपनीने काढली चक्क धोनीच्या नावाची कार
भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्रात 5 सामने खेळले जाणार; पुण्यात किती सामन्यांचं आयोजन?