क्रिकेटविश्वात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असला की दोन्ही संघातील आजीमाजी खेळाडू त्यांचे मत व्यक्त करत असतात. एकंदरच काही जण विरोधी संघावर टीका करत असतात. सध्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचा 15वा हंगाम सुरू आहे. यामध्ये हे दोन्ही संघ एका आठवड्याच्या अतंरातच दुसऱ्यांदा समोरासमोर येत आहेत. यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना दुबई येथे खेळला गेला. तर दुसऱ्या सामन्यापूर्वीच म्हणजे सुपर फोर सामन्याआधी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने खळबळजनक विधान केले आहे. हे नुसतेच विधान नसून त्यांनी सर्रास आरोप केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) पहिला सामना दुबई येथे खेळला गेला, तर रविवारी (4 सप्टेंबर) होणारा दुसरा सामनाही दुबई येथेच खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त (Sikander Bakht) यांनी भारताबाबत विवादास्पद विधान केले आहे. त्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील संघ शारजाह येथे खेळायला घाबरते. त्यांनी हे विधान ट्विव्ही चॅनलच्या एका चर्चासत्रामध्ये केले आहे. यावेळी कपिल देव, मोहम्मद अजहरुद्दीन आणि अतुल वासन हे पण उपस्थित होते.
झाले असे की, पाकिस्तानने या स्पर्धेतील दुसरा सामना शारजाह येथे खेळला. हाँगकाँग विरुद्धचा हा सामना त्यांनी 155 धावांनी जिंकला होता. बख्त यांनी जीईओ सुपर या चॅनेलवर म्हटले, “मला फक्त हेच जाणून घ्यायचे आहे की, भारत शारजाह किंवा अबू धाबी येथे का खेळत नाही? ते फक्त दुबई येथेच खेळतात. तुम्ही शारजाहमध्ये खेळायला घाबरता का?”
“जेव्हा या स्पर्धेचे वेळापत्रक आले तेव्हा पाकिस्तान विरुद्ध भारत सामना शारजाहमध्ये खेळला जाणार होता. मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला आणि सामना दुबई येथे हलवला गेला. तुम्ही शारजाहला जायला घाबरता का हा प्रश्न आमच्या चाहत्यांनी विचारला असून मी विचार केला हा प्रश्न मी पण तुम्हाला विचारू शकतो,” असेही बख्त यांनी पुढे म्हटले आहे.
भारताने शारजाहमध्ये एकही टी20 सामना खेळलेला नाही. तर वेगवान गोलंदाज बख्त यांनी पाकिस्तानकडून 26 कसोटी आणि 27 वनडे सामने खेळले आहेत. त्यांना उत्तर द्यायला कपिल देव किंवा अजहर हे नाही तर अतुल वासन हे पुढे आले. त्यांनी म्हटले, “शारजाहचे मैदान आमच्यासाठी खूप वाईट ठरले आहे. आता आम्ही आयसीसीच्या बाजूने आहोत आणि यामुळेच आम्ही तेथे खेळत नाही.”
तसेच आशिया चषकामध्ये भारताने 28 ऑगस्टला झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता. त्या सामन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने 3 विकेट्स घेत नाबाद 33 धावाही केल्या होत्या. आता सुपर फोरच्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा संघ ‘दुसऱ्या आफ्रिदी’च्या शोधात, भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया
Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताला घ्यावा लागणार मोठा निर्णय, दिनेश कार्तिकला बसावे लागेल बाहेर!
सीएसकेच्या कर्णधारपदी ‘कॅप्टनकूल’ धोनी कायम, आयपीएल 2023साठी झाली मोठी घोषणा