आशिया चषक 2022 मध्ये क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान थरार अनुभवायला मिळणार आहे. क्रिकेटविश्वातील हे कट्टर प्रतिद्वंद्वी रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. साखळी फेरीतील धडाकेबाज प्रदर्शनानंतर आता सुपर-4 फेरीत त्यांची लढत रंगेल. या सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम यांच्यानंतर शाहनवाज दहानी हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा संघ उपलब्ध वेगवान गोलंदाजांकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा करत आहे.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने वेगवान गोलंदाजीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संघात एकही असा गोलंदाज नाही, जो आफ्रिदीची (Shaheen Afridi) जागा भरून काढेल. परंतु गोलंदाजांकडे दुसरा आफ्रिदी बनण्याची संधी (Second Shaheen Afridi) नक्कीच आहे, असे त्याने म्हटले आहे.
रिझवान पत्रकार परिषदेत म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, सध्या पाकिस्तान संघात उपलब्ध असलेल्या वेगवान गोलंदाजांपैकी कोणीही आफ्रिदीची कमी भरून काढू शकत नाही. आफ्रिदीने गेल्या वर्ष-2 वर्षात ज्याप्रकारचे प्रदर्शन केले आहे, त्याची कमी येथे कोणताही गोलंदाज पूर्ण करू शकणार नाही. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, आम्हाला आणखी एक आफ्रिदी नक्की मिळू शकतो. आमच्या वेगवान गोलंदाजांकडे ही चांगली संधी आहे. नसीम शाह, हसन अली आणि हॅरिस राउफ संघात आहेत. अशात आम्हाला एक किंवा दोन आफ्रिदी नक्की मिळतील.”
पुढे बोलताना यष्टीरक्षक फलंदाज रिझवानने सांगितले की, “सर्वांनी पाहिले आहे, नसीम शाह दमदार प्रदर्शन करत सर्वांच्या नजरेत आला आहे. पाकिस्तान अगोदरपासूनच वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. आमच्याकडेही नेहमीत तगडे वेगवान गोलंदाज असतात. त्याचप्रकारे पुन्हा एकदा आम्हाला वेगवान गोलंदाजीमध्ये चांगले कॉम्बिनेशन मिळाले, तर हे पाकिस्तानसाठी खूप फायदेशीर ठरले.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताला घ्यावा लागणार मोठा निर्णय, दिनेश कार्तिकला बसावे लागेल बाहेर!
पाकिस्तानविरुद्ध विराटकडून फक्त ‘एवढीच’ अपेक्षा आहे, शतकाविषयी द्रविडची मोठी प्रतिक्रिया
अल्टिमेट खो खो स्पर्धेत तेलगु योद्धाज व ओडिशा जगरनट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत





