भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या जारी दुलीप ट्रॉफीमध्ये फारशी चमक दाखवू शकलेला नाही. स्पर्धेत इंडिया डी संघाचा कर्णधार असलेल्या अय्यरनं तीन डावात केवळ 63 धावा केल्या.
इंडिया डी संघाला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं, ज्यात अय्यरनं दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. मात्र बांगलादेश मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. त्याचवेळी दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात अय्यर पहिल्या डावात 7 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. श्रेयस अय्यरच्या या कामगिरीवरून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बसित अलीनं त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. बासित यांनी अय्यरवर टीका करत भारतीयांची माफी मागितली.
बसित त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले, “एक क्रिकेटपटू म्हणून हे पाहून वाईट वाटतं की, टॉप ऑर्डरमध्ये खेळूनही श्रेयस अय्यरची बॅट चालली नाही. तो तिसऱ्या क्रमांकावर उतरला. तो स्लिपमध्ये बाद झाला किंवा विकेटकीपरनं झेल घेतला, तरी काही प्रश्न नाही. पण जर तुम्ही समोरून आउट होत असाल तर याचा अर्थ तुमची एकाग्रता नाही. मी तुमची माफी मागून हे बोलत आहे. त्यानं वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन शतकं झळकावली होती. कर्णधार म्हणून त्यानं आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकली. दुलीप ट्रॉफीमध्ये त्यानं शतकं आणि द्विशतकं झळकावली पाहिजेत.”
बसित अली पुढे म्हणाले, “अय्यर खूप भाग्यवान आहे की दुलीप ट्रॉफीसाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची चारपैकी एकाही संघात निवड झाली नाही. मला असं वाटतं की, अय्यरला लाल चेंडूच्या क्रिकेटची भूक उरलेली नाही. मला वाटतं की त्याला फक्त चौकार-षटकारांची भूक आहे. हे होऊ नये. त्यानं क्रिकेटला प्राधान्य द्यावं. विश्वचषकात दोन शतकं झळकावून विराट कोहलीसारखा खेळाडू बनला आहे, असा विचार अय्यर करत असेल, तर तसं अजिबात नाही. विराट कोहलीची पातळी वेगळी आहे.”
माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाले, “ज्यांना अय्यर आवडतो, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. मी भारतीयांची माफी मागून सांगत आहे की, जर बसित अली भारतीय क्रिकेटपटू असता तर अय्यरला दुलीप ट्रॉफीच्या चारपैकी एकाही संघात स्थान मिळालं नसतं. माझ्या मनात जे आहे ते मी बोलतो. जर तुम्हाला वाईट वाटलं तर मला माफ करा. अय्यरनं क्रिकेटचा आदर केला पाहिजे. तो क्रिकेटला मान देत नाही.”
हेही वाचा –
ना धोनी, ना राहुल द्रविड; युवराज सिंगने या धाडसी फलंदाजाला आवडता कर्णधार म्हणून निवडले
‘कॅप्टन कूल’ वगैरे सर्व खोटे? सीएसकेच्या माजी खेळाडूने उघडले पडद्यामागचे गुपीत
दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात संजू सॅमसन पुन्हा फ्लॉप; ‘टीम इंडियाचे दरवाजे बंद?