---Advertisement---

‘भारतीयांनी चेंडूसोबत छेडछाड केलीय’, अर्शदीप सिंगवर गंभीर आरोप

On: बुधवार, जून 26, 2024 9:02 AM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. स्पर्धेत आतापर्यंत टीम इंडिया एकही सामना गमावला नाही. सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात इंडियाने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी दणदणीत विजय मिळवून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता या दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर भारतीय गोलंदाजांवर गंभीर अरोप केल्याचे समोर येत आहे.

एका टीव्ही चॅनेलशी बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इंझमाम-उल-हकने भारतीय वेगवान गोलंदज अर्शदीप सिंगवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. तो पुढे म्हणाला अर्शदीपसारखा सामान्य गोलंदाज चेंडू उलट (रिव्हर्स स्विंग) कसा करु शकतो? तसेच, हेराफेरी आणि बॉल टेम्परिंग यासारख्या गोष्टींसाठी भारत ओळखला जातो. त्यामुळे  मला वाटते की बॉल टॅम्परिंग करुन भारत जिंकत आहे. आता या प्रकरणी आयसीसीने आता कारवाई करावी.

अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात डेथ ओव्हरर्समध्ये गोलंदाजी करताना त्याचे चेंडू रिव्हर्स स्विंग होत होते त्यामुळे भारताने सामना जिंकला कारण अर्शदीप ज्या पध्दतीने गोलंदाजीची टाकतोत्यामुळे त्याचा चेंडू शेवटच्या षटकात रिव्हर्स स्विंग होऊ शकत नाही. जर बुमराह गोलंदाजी करत असता तर तो ज्या पध्दतीने गोलंदाजी करतो त्याचा चेंडू रिव्हर्स स्विंग होणार यात शंका नाही. पण भारतीय संघाने चेंडूची छेडछाड केली आहे. असे म्हणत इंझमाम-उल-हकने अरोप केले आहेत. आता याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हारल होत आहे.

सुपर 8 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारतीय संघाने कांगारुना 24 धावांनी मात दिली. कर्णधार रोहित शर्माच्या 41 चेंडूत 92 धावांची विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर 206 धावांचे तगडे लक्ष्य ऑस्ट्रेलिया समोर ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला 181 धावांपर्यंतच मजल मारता आली.

महत्तवाच्या बातम्या-

भारतानं ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, आता नंबर इग्लंडचा!
अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक, तालिबानने मानले भारताचे आभार…!!!
खराब क्षेत्ररक्षणामुळे जोनाथन ट्राॅट भडकले, कचराकुंडीला मारली जोरात लाथ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---