मंगळवारपासून (3 जुलै) भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लड दौरा सुरु झाला आहे.
भारतीय संघाने पहिला टी-20 सामना जिंकत या दौऱ्याची शानदार सुरवात केली आहे.
भारतीय संघ या इंग्लड दौऱ्यात तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
सध्या भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये आहेत.
भारतीय संघाला भूतकाळात इंग्लंडमध्ये काही अपवाद वगळता फार चांगली कामगिरी करता आली नाही.
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद यूसुफने या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ तीन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला भारी पडेल असे म्हटले आहे. मोहम्मद यूसुफने त्याचे हे मत ट्विटरवर मांडले आहे.
“मला असे वाटतेय की भारतीय संघ तीन्ही प्रकारात इंग्लंडला पराभूत करेल.”
I think indian team will win all three format against england.
— Mohammad Yousaf (@yousaf1788) July 5, 2018
मोहम्मद यूसुफ पाकिस्तानचा एक यशस्वी फंलंदाज होता. तो पाकिस्तान संघाकडून 1998 ते 2010 या कालावधीत खेळला आहे.
त्याने पाकिस्तानसाठी खेळलेल्या 90 कसोटी सामन्यात 52.29 सरासरीने 7530 धावा केल्या आहेत.
तर 288 एकदिवसीय सामन्यात 41.72 च्या सरासरीने 9720 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-तब्बल सहा महिन्यानंतर मोहम्मद शमीच्या आयुष्यात चांगली घटना
-सुरेश रैनाला आज एबी डेविलियर्सला मागे टाकण्याची संधी






