क्रिकेटटॉप बातम्या

“टीम इंडियाला शिखरची गरज”, विश्वचषकासाठी संघात समाविष्ट करण्याची दिग्गजाची मागणी

भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी आता अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या विश्वचषकासाठी यजमान भारतीय संघ कसा असेल? याबाबत सातत्याने चर्चा होताना दिसते. भारतीय संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मासह कोण स्थान पटकावणार हा संभ्रम अजून कायम आहे. असे असतानाच पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने अनुभवी सलामीवीर शिखर धवन याच्याबाबत एक मोठे विधान केले.

मागील काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या शिखर याला भारतीय संघात स्थान मिळणार नाही अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना बट आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला,

“मला वाटते की अजूनही भारतीय संघाला शिखर धवनची गरज आहे. सध्या भारताकडे त्याच्या इतका उत्तम डाव्या हाताचा सलामीवीर नाही. भारताला विश्वचषकात अनुभवाची गरज आहे. अनेक वेळा युवा खेळाडू दबावाला बळी पडतात. अशावेळी तुम्ही अशा अनुभवी खेळाडूंवर भरवसा ठेवू शकता. तसेच, सहाव्या क्रमांकावर के एल राहुल व अजिंक्य रहाणे हे देखील चांगले पर्याय आहेत.”

सध्या भारतीय संघात रोहित शर्मा व शुबमन गिल हे सलामीवीराची भूमिका पार पाडतात. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्याच डावात शतक करून पुढील काही काळासाठी तरी आपली जागा निश्चित केली आहे. त्यामुळे 38 वर्षांच्या शिखरला आता पुन्हा एकदा संधी मिळणे अशक्य असल्याचे दिसते.

शिखरने आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी 34 कसोटी, 167 वनडे व 68 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून दहा हजार पेक्षा जास्त धावा निघाल्या असून, आयसीसी स्पर्धांमध्ये तो सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसलेला. तसेच मागील काही मालिकांमध्ये त्याने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केलेले.

(Former Pakistan Cricketer Salman Butt Said India Need Shikhar Dhawan As Opener In ODI World Cup)

महत्वाच्या बातम्या-  
विराट आणि रोहितमध्ये सर्वोत्तम कोण? विंडीजच्या स्टार खेळाडूने क्षणाचाही विलंब न करता सांगितले उत्तर
जगातील सर्वोत्तम कर्णधार कोण? पाकिस्तानी खेळाडूने बाबर अन् इम्रान नाही, तर ‘या’ भारतीयाचे घेतले नाव

Related Articles