टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला. या पराभवांनंतर चाहत्यांपासून ते पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी संघ, त्यांचे खेळाडू आणि संघ व्यवस्थापनावर टीकास्त्र डागले. तसेच, संघाच्या योजनेसोबतच संघनिवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. अशात पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाज याने भारताचे उदाहरण दिले आहे. तो म्हणाला आहे की, ज्याप्रकारे बीसीसीआय आणि त्यांचे संघव्यवस्थापन विचार करते, तसे आमच्याकडे होत नाही. रिषभ पंत याच्यासारखा यष्टीरक्षक फलंदाज पाकिस्तानकडे असता, तर त्याला कधीच विश्वचषकातून बाहेर बसवले नसते.
माध्यमांशी बोलताना वहाब रियाज (Wahab Riaz) म्हणाला की, “तुमची सिस्टीम मजबूत असेल, तर अशा गोष्टी होणार नाहीत. हे मजबूत कोण करते, ज्याच्याकडे नेतृत्व असते तो. एक निवडप्रक्रिया अशी आहे की, आमिर असो उमर गुल असो किंवा शोएब अख्तर किंवा सोहेल तन्वीर असो, जर ते घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कागमिरी करत असतील, ते फिट असतील, तर त्यांना खेळवले पाहिजे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “याचे उदाहरण आपला शेजारी देश आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. एमएस धोनीनंतर ज्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावले आहे. जर तो पाकिस्तानात असता, तर विश्वचषकात कधीच बाहेर बसवले नसते. भारताने दिनेश कार्तिकच्या जागी त्याला बसवले, का? त्यांना माहितीये की, पंत चांगला क्रिकेटपटू आहे, पण त्या एका खास जागी त्यांना एक फिनिशर पाहिजे. दोन षटकार मारेल, पण जर तो सामना संपवू शकला नाही, तर आम्ही पराभूत होऊ, असा विचार ते करतात.”
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या षटकात शानदार विजय मिळवला होता. दुसरीकडे, नेदरलँड्सविरुद्धही भारताने सोपा विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारताकडून दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती. वहाबने याच गोष्टीचा उल्लेख करत रिषभ पंतबद्दल वक्तव्य केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक खुलासा! म्हणाला, ‘ड्र’ग्जने आयुष्य उद्ध्वस्त केले, पत्नीच्या मृत्यूने…’
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेशचा झिम्बाब्वेवर रोमांचक विजय, केली भारताची बरोबरी






