पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांनी वयाच्या 79व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रविवारी (दि. 5 फेब्रुवारी) दुबईच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून आजारी होती. ते मार्च 2016पासूनच दुबईत शिफ्ट झाले होते. तसेच, ते तिथेच राहत होते. त्यांनी 2001 ते 2008 यादरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद भूषवले होते. यादरम्यानच भारतीय संघ शेवटचा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी त्यांनी भारतीय संघाचा खेळाडू एमएस धोनी याचेही तोंडभरून कौतुक केले होते.
परवेज मुशर्रफ यांचे क्रिकेट कनेक्शन
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात क्रिकेटविषयी तणावाचे वातावरण आहे. मात्र, 2004 आणि 2006मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा दौरा केला होता. त्यावेळी परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) हे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. तसेच, भारतीय संघाचे त्यांनी दिमाखात स्वागत केले होते. त्यांनी भारतीय संघाला यादरम्यान आपल्या घरीदेखील आमंत्रित केले होते. तसेच, रावळपिंडी येथे शतक ठोकल्यामुळे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे अभिनंदनही केले होते.
परवेज यांनी एमएस धोनीकडे केली होती ‘ही’ मागणी
त्यावेळी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात लांब केस असणारा एमएस धोनी (MS Dhoni) हा भलताच चर्चेत होता. सामन्यानंतर बोलताना परवेज यांनी धोनीकडे त्याच्या केसासंबंधित मागणी केली होती. त्यांनी धोनीला म्हटले होते की, तो लांब केसांमध्ये चांगला दिसतो. तसेच, त्यांचा सल्ला आहे की, त्याने केस कापू नये. एमएस धोनी आणि परवेज मुशर्रफ (MS Dhoni And Pervez Musharraf) यांच्यातील हा छोटा मात्र लोकप्रिय संवाद इतका व्हायरल झाला होता की, नंतर हा धोनीच्या बायोपिकमध्येही वापरण्यात आला होता.
One of the most iconic scenes. Former president and Gen. @P_Musharraf (Retd.) praising msd for his hairstyle..!!#Dhoni pic.twitter.com/5VPGh1PcfW
— kowalski (@private2ricoo) August 15, 2020
भारताचा शेवटचा पाकिस्तान दौरा
भारतीय संघाचा हा शेवटचा पाकिस्तान दौरा होता. 2006च्या या दौऱ्यात भारतीय संघाने 3 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 5 वनडे सामनेही खेळले होते. कसोटी मालिका भारताने 0-1ने गमावली होती. मात्र, 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 4-1ने विजय मिळवला होता. (former pakistan president pervez musharraf cricket connection request ms dhoni dont cut his haircut during indian tour of pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींना देवाज्ञा, दुबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणारच नाही! आशिया चषक 2023 विषयी जय शहांची ठाम भूमिका






