पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सलमान बट हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव आहे. त्याने अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. नुकतेच त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक करत ओएन मॉर्गन बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. तरीदेखील, सलमान बटला असे वाटते की, ओएन मॉर्गनकडे योग्य रणनिती आखण्याचे कौशल्य नाहीये. बटने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “विश्वचषक स्पर्धेदरम्यान एक कर्णधार म्हणून, ओएन मॉर्गनची रणनिती योग्य नव्हती. आपल्या गोलंदाजांचा योग्यरित्या वापर न करणे दर्शवते की तुमच्याकडे योग्य रणनिती नव्हती. रणनिती आखण्याच्या बाबतीत धोनी सर्वश्रेष्ठ आहे. ”
‘विश्वविजेता कर्णधार मॉर्गनमध्ये नाहीत नेतृत्वगुण तर रणनिती आख्यण्यात धोनी श्रेष्ठ’, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोठा दावा
तसेच सलमान बटने, भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज, रोहित शर्माचे कौतुक करत म्हटले की, “आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्माची रणनिती देखील स्पष्ट असते. परंतु इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन रणनिती आखण्यात तितका तरबेज नाहीये. कारण इंग्लंड संघ ३०० ते ३५० धावांचे आव्हान गाठू शकतात. परंतु जेव्हा या धावांचा बचाव करायचा असतो. तेव्हा मात्र कुठलीही रणनिती दिसून येत नाही.”
विराट कोहलीचे केले कौतुक
सलमान बटने, भारतीय कर्णधार विराट कोहलीचे ही तोंडभरून कौतुक केले. त्याने म्हटले की, “विराट कोहली खेळाच्या तीनही प्रकारामध्ये, जगातील सर्वात प्रभावी खेळाडू आहे. कोहलीची प्रतिभाच त्याच्याबद्दल खुप काही सांगते. त्याचे प्रदर्शन संघाच्या कामगिरीत महत्त्वाचे ठरते.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ओएन मॉर्गनची कामगिरी
इंग्लंड संघाचा कर्णधार, ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली, इंग्लंड संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्याने आतापर्यंत एकूण १२१ सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. यात त्याला ७२ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ४० सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासोबतच २ सामने बरोबरीत सुटले होते. तर ७ सामने हे अनिर्णित राहिले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणारा राशिद खान झाला सिंगर, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
शापितांचा शापित ‘अमोल मुजुमदार’
ज्या मुंबईतून क्रिकेटचे संस्कार झाले, त्याच मुंबई संघाचा ‘महागुरु’ बनलेल्या अमोल मुजुमदारचा प्रवास