पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफ यांनी विराट कोहलीबद्दल हैराण करणारे विधान केले आहे. बांगलादेशमध्ये खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 72वे शतक झळकावले. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर आहे, ज्याच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाची नोंद आहेे. अशातच पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफ यांनी विशेष वक्तव्य केले, जे चर्चेचा विषय बनले आहे.
राशिद लतीफ (Rashid Latif) यांना एका यूट्यूब चॅनलवर विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल प्रश्न केेला गेला. यावर त्यांनी सरळ शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. त्यांना विचारण्यात आले की, आता कोहली सचिनच्या 100 शतकांचा विश्वविक्रम मोडू शकतो का? ज्यावर या त्यांनी आपले वेगळे मत मांडले. ते म्हणाले की, “मला वाटते की चाहते कोहलीची 100 शतकांचा विक्रम मोडण्याची नाही तर भारतीय संघाने आयसीसी स्पर्धा जिंकण्याची जास्त वाट पाहत आहेत. शतकांची संख्या मोजण्याची ही वेळ नाहीये. ही गोष्ट जास्त महत्वाची देखील नाही. भारतासाठी आयसीसी स्पर्धा जिंकणे फार गरजेचे आहे. बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाने आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. कोहलीने 200 शतके जरी मारली, तरी त्यांना आयसीसी ट्रॉफी जिंकावी लागेल.
यापुढे ते म्हणाले की, “भारतीय क्रिकेट आणि चाहत्यांसाठी काही महत्वाचे आहे, तर ते आयसीसी किताब जिंकणे आहे. जर तुम्ही आर्थिक बाबींवर लक्ष दिले तर आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट खूप मजबूत आहेे. मात्र, आता आयसीसी ट्रॉफीसाठी चाहते आणि माध्यमे दबाव टाकत आहेत. कोहलीने 100 शतके जरी झळकावली, तरी चाहत्यांची मागणी आता बदलली आहे.”
तेंडूलकरचा हा विक्रम मोडू शकतो विराट कोहली
कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील 44वे शतक पूर्ण केले आहेे. आता कोहलीकडे सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतके झळकावली आहेत. कोहली अजून 6 शतके झळकावून हा मोठा विक्रम मोडू शकतो.(Former Pakistani wicketkeeper Batsman Rashid Latif said that ICC trophy is more important than Kohli’s 100 centuries)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जो रुटने केला महापराक्रम, बनला कसोटी क्रिकेटमध्ये ‘असे’ करणारा तिसरा खेळाडू
47000 प्रेक्षकांसमोर भारतीय महिला संघाचा व्हिक्टरी लॅप, व्हिडीओ पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान