पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेेट बोर्डाचे अध्यक्ष पदावरुन रमीझ राजा यांची हकालपट्टी झाल्यावर नजम सेठी यांनी पीसाबीची कमान आपल्या हाती घेतली आणि त्यांनी येताच शाहीद आफ्रिदी याच्यावर अंतरिम मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवली. ही नवी जबाबदारी आफ्रिदीवर सोपवण्यात आल्याने त्याला अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. मात्र.आफ्रिदीच्या आनंदात विरजण पडले. पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू दानिश कनेरीया याने त्याला बेधडक ट्रोल केले. दानिशने आफ्रिदीची बॉल टेंपरिंग करतानाचा फोटो आप्लाय ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला.
दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) याचा चेंडू कुरडतानाचा फोटो शेअर केला. त्याचबरोबर त्याने त्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलेे की ‘चीफ सिलेक्टर’ आणि त्यासोबत हसण्याचे ईमोजी लावले. ही कुख्यात घटना पर्थ येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघामधील टी20 मालिकेदरम्यान घडली होती. आफ्रिदीने चेेंडू तोंडाने कुरतडून चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना टीव्हीवर सामन्याचे लाईव्ह प्रसारण करताना दिसली होती. या कृत्यामुळे त्याच्यावर 2 टी20 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.
आफ्रिदीचे ही कृत्य करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत दानिशने त्याच्या जखमेवर चांगलेच मीठ चोळले. मात्र, यामुळे त्याच्या या कृतीमुळे काही पाकिस्तानी चाहते चिडले आणि त्याला फिक्सिंगच्या गोष्टी आठवणीत आणून देऊ लागले. 2009 य वर्षांमध्ये इंग्लिंश काऊंटी क्रिकेट चॅंम्पियनशीपच्या प्रो-लीग सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याला 2012मध्ये बंदी घातली होती. कनेरियाने 6 वर्षांनंतर 2018मध्ये स्पॉट फिक्सिंगचे त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप स्वीकारले होते.
न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेआधी शाहीद आफ्रिदी याला पाकिस्तान पुरुष संघाचा अंतरिम मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले. या निवड समितीत माजी खेळाडू अब्दुल रझ्झाक (Abdul Razzak) आणि राव इफ्तिखार अंजुम (Rao Iftikhar Anjum) यांचा समावेश आहे. हारुन रशीद (Harun Rashid) हे व्यवस्थापक असणार आहेत. ही समिती फक्त पाकिस्तानमध्ये होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी नियुक्त करण्यात आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ठरलं तर, श्रीलंकेविरुद्ध भारताचे कर्णधारपद हार्दिककडेच! व्हिडिओ आला समोर
भाऊ पेटलाय! रोहित लागोपाठ दोन दिवसांपासून नेटमध्ये गाळतोय घाम, श्रीलंकेविरुद्ध मिळणार का संधी?






