---Advertisement---

“गंभीर भारतीय संघात फार काळ टिकणार नाही”, माजी भारतीय खेळाडूचा खळबळजनक दावा

gautam gambhir
---Advertisement---

Head Coach Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघ आजपासून (27 जुलै) श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही नवनिर्वाचीत प्रशिक्षक गौतम गंभीर याची पहिलीच परिक्षा असेल. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ या मालिकेत कशी कामगिरी करतो?, हे पाहावे लागेल. तत्पूर्वी माजी भारतीय खेळाडू जोगिंदर शर्मा याने गंभीरबाबत मोठा दावा केला आहे. गंभीर भारतीय संघात जास्त काळ टिकू शकणार नाही, असा खळबळजनक दावा जोगिंदर शर्माने केला आहे.

जोगिंदर शर्मा भारताच्या 2007 सालच्या विश्वविजेत्या संघाचा भाग राहिला आहे. एका मुलाखतीत जोगिंदर शर्माने म्हटले की, “गौतम गंभीर संघाला नक्कीच सांभाळू शकतो. पण, मला वाटते की तो भारतीय संघात फार काळ टिकणार नाही. कारण की त्याचे स्वत:चेच काही निर्णय असतात. त्यामुळे एखाद्या खेळाडूसोबत त्याचा वाद होऊ शकतो. गंभीरने घेतलेले निर्णय अनेकदा अनेकांना खटकतात. तो श्रेय घेणाऱ्यांपैकी नाही, तो त्याचे मनापासून काम करत असतो यात शंका नाही.”

दरम्यान भारतीय संघ शनिवारपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळायला सुरुवात करेल. या मालिकेत नवखा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या कामगिरीवरही विशेष लक्ष असेल. कारण टी20 विश्वचषक 2024 विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने क्रिकेटच्या या स्वरुपातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ रोहितच्या योग्य पर्यायाच्या शोधात आहे. प्रशिक्षक गंभीर यांनी सूर्यकुमारवर विश्वास दाखवत त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली असल्याने तो कशी कामगिरी करतो?, हे पाहावे लागेल.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – 

पॅरिसच्या सीन नदीवर फडकला तिरंगा, 2024 ऑलिम्पिक खेळांना धडाक्यात सुरुवात
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल
देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---