केएल राहुलला 2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. टी20 विश्वचषकानंतर युवा टीम इंडियानं पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केली. राहुल त्या संघातही नव्हता. आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. केएल राहुलला वनडे मालिकेसाठी संघाचा भाग बनवण्यात आलं आहे. या मालिकेपूर्वी राहुल एक ‘फायटर प्लेन’ उडवताना दिसला.
राहुलनं ‘फायटर प्लेन’ उडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विमान उडवल्यानंतर राहुलनं आपला अनुभवही शेअर केला. व्हिडीओमध्ये राहुल विमानाच्या ‘कॉकपिट’मध्ये (ज्या ठिकाणी विमान नियंत्रित केलं जातं) बसल्याचं दिसत आहे. राहुलसोबत इतर वैमानिकही उपस्थित होते. विमान उडवण्यापूर्वी राहुल म्हणाला, “मी उत्साहित आहे, घाबरलो आहे, भीती पण वाटत आहे. सर्वकाही होत आहे.”
विमान उडवल्यानंतर राहुलनं आपला अनुभव सांगितला. राहुल म्हणाला, “आम्ही डावीकडून उजवीकडे उलटे वळलो. आम्ही आणखी वर गेलो आणि खाली आलो. संपूर्ण 20 मिनिटे मी फक्त समोरच पाहत होतो. इतर कुठेही दिसत नव्हतं. हे खूप भीतीदायक होतं.” तुम्ही केएल राहुलचा हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
KL Rahul from Pitch to the Cockpit. 🔥#GivesYouWiiings pic.twitter.com/TSjEs9N4VB
— Johns. (@CricCrazyJohns) July 26, 2024
टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत केएल राहुलबद्दल बोलताना अजित आगरकर म्हणाले की, राहुल सध्या भारताच्या टी20 प्लॅनमधून बाहेर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही राहुलला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आलेलं नाही. गेल्या वर्षीपर्यंत तो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू होता. मात्र आता सध्या तो केवळ एकदिवसीय संघात आहे.
हेही वाचा –
3 खेळाडू जे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतून बाहेर झाले, एक जण तर रुग्णालयात दाखल!
राहुल द्रविडचा विशेष संदेश, गाैतम गंभीर भावूक; बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
IND vs SL: नव्या पर्वाला होणार सुरुवात; या कारणांमुळे टी20 मालिका ठरणार खास!