दक्षिण आफ्रिका विरुद्ध (India tour of South Africa) भारत या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी जोरदार विजय मिळवला होता. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी माजी निवडकर्त्याने चेतेश्वर पुजाराला चेतावणी दिली आहे. (former selector given warning to cheteshwar pujara)
माजी निवडकर्ते सरनदीप सिंग(Sharandeep singh) यांनी म्हटले की, “आपला फलंदाजी विभाग चांगली कामगिरी करत नाहीये. केएल राहुल हा एकमात्र फलंदाज आहे जो चांगली कामगिरी करतोय. आपण फक्त केएल राहुल आणि विराट कोहलीवर निर्भर राहू शकत नाही. चेतेश्वर पुजाराला धावा कराव्या लागतील. आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas iyer) संघात स्थान मिळवण्यासाठी आतुरतेने वाट पाहतोय. पुजारा एक वरिष्ठ खेळाडू आहे, जर तो चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला संघाबाहेर व्हावे लागेल.”
तसेच मालिका जिंकण्याबाबत ते म्हणाले की, “भारतीय संघ खरचं खुप चांगली कामगिरी करतोय. मला पूर्ण विश्वास आहे की, भारतीय संघ या मालिकेत विजय मिळवणार. तसेच स्पष्टपणे दिसून येत आहे की, दक्षिण आफ्रिका संघ ही मालिका फक्त खेळण्यासाठी खेळतोय, जिंकण्यासाठी नव्हे. दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी कमकुवत आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात क्विंटन डी कॉक उपलब्ध नसणार आहे, ज्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी आणखी कमजोर होईल.”
भारतीय गोलंदाजी आक्रमणाबाबत बोलताना ते म्हणाले की, ” आपल्या संघातील गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतायेत. तुम्ही पाहू शकता की, मोहम्मद सिराजला ईशांत शर्माच्या आधी भारतीय प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान देण्यात आले. यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की तो किती चांगली कामगिरी करतोय. तसेच, जसप्रीत बुमराह लाजवाब आहे.”
महत्वाच्या बातम्या –
यंदाचं वर्ष विश्वचषकाचं! क्रिकेट ते हॉकी २०२२ मध्ये रंगणार मोठ्या स्पर्धा, जाणून घ्या एकाच क्लिकवर
हे नक्की पाहा :






