जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. मागच्या वर्षी आशिया चषक, त्यानंतर टी20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. लागोपाठ तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश अल्याने कर्णधार रोहित शर्मा व रोहित शर्मा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. त्यांच्या समर्थनार्थ आता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ पुढे आला आहे.
भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात यावे अशी मागणी होत असताना एका मुलाखतीत स्मिथ म्हणाला
“कर्णधारावर स्वतःच्या कामगिरीचा नेहमी दबाव असतो. अशा मोठ्या सामन्यांमध्ये तो अधिक वाढतो. रोहित आणि भारतीय संघावर टीका करण्यासारखी ही गोष्ट नाही. तो एक खराब सामना होता. तुम्ही हे देखील ध्यानात घ्यायला हवे की याच खेळाडूंनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवले होते. एका रात्रीत सर्व गोष्टी बदलता येत नाहीत.”
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी बोलताना तो म्हणाला,
“भारतात प्रचंड गुणवत्ता आहे. तुम्ही एकाच वेळी तीन-चार संघ बनवू शकता. राहुल द्रविड याने प्रशिक्षक झाल्यापासून चांगले निकाल लावलेले दिसतात. त्याच्या खांद्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. एक खेळाडू म्हणून तो किती महान होत आहे सांगण्याची गरज नाही. आताच्या परिस्थितीत त्याला पुन्हा एकदा संघाला नव्याने बांधण्याची संधी देण्यात यावी.”
भारतीय कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांची हकालपट्टी करण्याची मागणी वाढत आहे. तसेच रोहित शर्मा यांच्याकडून कर्णधारपद काढून घ्यावे असे देखील बोलले जाते. आगामी वनडे विश्वचषकात भारतीय संघ विजय मिळवून शिकल्यास राहुल द्रविड यांचे प्रशिक्षक पद देखील जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
(Former South Africa Captain Greame Smith Backs Rohit Sharma And Rahul Dravid After WTC Final Defeat)
महत्वाच्या बातम्या –
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
बांगलादेशने उद्ध्वस्त केले कसोटी क्रिकेटचे रेकॉर्ड, अफगाणिस्तावर मिळवला 500हून अधिक धावांनी दणदणीत विजय