---Advertisement---

धोनी, कोहली नाही ‘हा’ भारतीय जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक! जाॅन्टी रोड्सचा मोठा खुलासा

On: शनिवार, ऑगस्ट 31, 2024 6:08 PM
team india
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाबद्दल बोलायचं झालं, तर चाहते दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सचे (Jonty Rhodes) नाव घेतात. रोड्सने आपल्या क्षेत्ररक्षणामुळे अनेक चाहत्यांची मनं जिंकली. तत्पूर्वी त्यानं एका भारतीय क्रिकेटपटूला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घोषित केलं होतं. महान क्षेत्ररक्षक रोड्सने भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हटलं आहे.

जाॅन्टी रोड्स (Jonty Rhodes) म्हणाला की, “मैदानावर कोणत्याही परिस्थितीत क्षेत्ररक्षण करण्याची जडेजाची चपळता त्याला सर्वोत्तम बनवते. सुरेश रैना (Suresh Raina) देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पण जडेजा हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे.”

जडेजाची जॉन्टी रोड्ससारख्या महान क्षेत्ररक्षकाने केलेली स्तुती ही भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जडेजाची क्षेत्ररक्षण क्षमता त्याला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बनवते. सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडूचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर) पासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे, त्यानंतर दुसरा कसोटी सामना (27 सप्टेंबर) पासून ग्रीन पार्क, कानपूर येथे रंगणार आहे.

जडेजाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 72 कसोटी, 197 एकदिवसीय आणि 74 टी20 सामने खेळले आहेत. 72 कसोटी सामन्यात त्यानं 3,036 धावा केल्या आहेत, तर सोबतच त्यानं 294 विकेट्स देखील घेतल्या आहेत. 197 एकदिवसीय सामन्यात त्यानं 220 विकेट्स घेतल्या, तर 2,756 धावा देखील केल्या. 74 टी20 सामन्यात जडेजानं 515 धावा केल्या आहेत, तर सोबतच 54 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

55 चेंडू, 165 धावा; लखनऊच्या फलंदाजाचा कहर; टी20 सामन्यात तब्बल 300+ धावा
IPL 2025 पर्यंत टीम इंडियाचे वेळापत्रक समोर; चॅम्पियन्स ट्रॉफीसह या देशांसोबत खेळली जाणार मालिका
भारताला मिळाला नवा ‘युवराज सिंग’,6 चेंडूत सलग 6 षटकार मारून केला कहर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---