दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू डेन वॅन निकर्क हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार पक्का केला आहे. सध्या वॅन निकर्क भारतात सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. निकर्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून थेट निवृत्तीची घोषणा केली नसली, तरी लवकरच तीन अधिकृत घोषणा करेल. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे लवकरच ती निवृत्ती घेणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
डेन वॅन निकर्क (Dane van Niekerk) हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून स्टोरी शेअर केली, ज्यात खास संदेश लिहिला आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “आपल्या आयुष्यातील काही अध्याय संपले नसले, तरी ते संपल्याचे आपण मान्य केले पाहिजे. जे आधीच तुटले आहे, तरे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही.” वॅन निकर्सने या पोस्टमध्ये निवृत्तीचा कुठलाच उल्लेख केला नाहीये. पण तिची सहकारी खेळाडू मारिजान केप (Marizanne Kapp) हिने, “एका युगाचा अंत,” अशा कॅप्शनसह एक खास पोस्ट शेअर केली. केपच्या या पोस्टमध्ये संघाची माजी कर्णधार वॅन निकर्कच्या आढवणी जोडलेल्या आहेत. निकर्कने देखील ही पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केली आहे.
End of an era.. 💔🥹 pic.twitter.com/nefrlzussr
— Marizanne Kapp (@kappie777) March 11, 2023
मागच्या महिन्यात आयसीसीचा महिला टी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत पार पडला. मायदेशात खेळल्या गेलेल्या या महत्वाच्या स्पर्धेत निकर्क मात्र दक्षिण आफ्रिका संघाचा भाग नव्हती. निकर्कला संघातून वगळल्यामुळे चांगलाच वाद देखील पेटला होता. तिच्या अनुपस्थितीत सुने लूस (Sune Luus) हिने दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केले. लूसच्या नेतृत्वत आफ्रिकी संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला पण ऑस्ट्रेलियाने याठिकाणी त्यांना मात दिली. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने लूसला त्यांचा संघाची नियमित कर्णधार म्हणून देखील घोषित केले.
माहितीनुसार निकर्कने टी-20 विश्वचषकापूर्वी झालेल्या फिटनेस चाचणीत स्वतःला सिद्ध केले नव्हते. अवघ्या 18 सेकंदाच्या अंतरामुळे तिला ही चाचणी पार करता आली नाही. निकर्कने तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2021मध्ये खेळला होता. त्यानंतर घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. मोठ्या काळानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात निकर्क मायदेशातील तिरंगी मालिकेत पुनरागमन करणार असल्याचे बोलले जात होते. पण फिटनेसच्या कारणास्तव तिला संघात पुनरागमन करता आले नाही. पुढे टी-20 विश्वचषकातून देखील तिचे नाव वगळण्यात आले आहे.
निकर्कच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर आफ्रिकी महिला संघासाठी एक कसोटी, 107 वनडे आणि 86 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये तिने अनुक्रमे 22, 2175, 1877 अशा धावा केल्या आहेत. तर 1, 138 आणि 65 अशा विकेट्स तिने या तीन फॉरमॅटमध्ये घेतल्या आहेत.
(Former South African captain Dane van Niekerk set to retire from international cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्धशतक संघाच्या आणि विराटच्या स्वतःच्याही ठरले फायद्याचे, सचिन टॉपवर असलेल्या यादीत मिळवली जागा
धक्कादायक! अहमदाबाद कसोटीवर खलिस्तानींची नजर! हल्ल्याच्या धमकीनंतर वाढवली दोन्ही संघांची सुरक्षा