भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या मागचे दोन्ही आयपीएल हंगामांमध्ये अंतिम सामना खेळला आहे. दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन त्याच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. असे असले तरी, पंड्याने धीर न सोडता पुनरागमन केले आणि संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू लागला. दुखापतीनंतर वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी केळलेला पंड्या अद्याप कसोटी फॉरमॅटमध्ये खेळू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी अष्टपैलू लांस क्लूजनरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा महत्वाचा भाग असणारा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 2018 साली आशिया चषकादरम्यान पहिल्यांदा दुखापतग्रस्त झाला. त्यावेळी त्याला अक्षरशः स्ट्रेचरच्या सहायाने मैदानाबाहेर नेले गेले होते. दरम्यानच्या काळात दुखापतीमुळे तो संघातून आत बाहेर होत राहिला. पण कसोटी फॉरमॅटमध्ये त्याला अजूनही पुनरागमन करता आले नाहीये. आता दुखापतीला जवळपास पाच वर्ष झाली आहेत आणि अद्याप कसोटी जर्ती त्याला चाहते पाहू शकले नाहीत. अनेकांच्या मते हार्दिकेने एकप्रकारे कसोटी क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी क्रिकेटपटू लांस क्लूजनर (Lance Klusner) याला वाटते की, पंड्याने खूपच सहजासहची कसोटी क्रिकेटमधून माघार घेतली आहे. त्याच्या मते हार्दिक या फॉरमॅटमध्ये पुनरागमनासाठी अजून प्रयत्न केले पाहिजे होते.
क्लूसनरला नुकतेच त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले आहे. ही नवीन भूमिका स्वीकारल्यानंतर त्याने कोलकाता येथे पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत बोलताना लांस क्लूजनर म्हणाला की, “हार्दिक पंड्याने कसोटी क्रिकेटसमोर खूपच लवकर घुडघे टेकले, असे वाटते. माझ्या मते, क्रिकेटपटू म्हणून तुमची उंची किती आहे, हे कसोटी क्रिकेटमधूनच समजते. त्याच पद्धतीने तुम्हाला ओळखही मिळते.”
दरम्यान, आयपीएल 2022 प्रमाणे यावर्षीही हार्दिकच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघ आयपीएल ट्रॉफी उंचावणार, असी परिस्थिती आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात आली होती. पण शेवटच्या दोन चेंडूवंर 10 धावा हव्या असताना रविंद्र जडेजा याने एक षटकार आणि एक चौकार मारून ही ट्रॉफी पाचव्यांना चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर केली. (Former South African cricketer opined that Hardik Pandya gave up too early in Test cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
‘खिलाडी निकले हिरे की खान से’, प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी महाराष्ट्र आयर्नमेनचे संघगीत लाँच
UTT सीझन 4 साठी पार पडला प्लेअर ड्राफ्ट; फ्राँचायझींनी निवडले तगडे खेळाडू!