---Advertisement---

लेकासाठी धाऊन येणार बाप! क्रिकेटच्या देवाचे अर्जुनच्या भविष्यावर मोठे भाष्य; म्हणाला, ‘त्याला वेळ द्या’

On: शनिवार, जून 3, 2023 9:16 PM
Sachin-Tendulkar-and-Arjun-Tendulkar
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या भविष्याविषयी खुलासा केला. “अर्जुनला खेळावर पुर्णपणे लक्ष देण्याचा” सल्ला यावेळी सचिनने दिला आहे. अर्जुनने गेल्या महिन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये पदार्पण केले. तसेच, डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने चार सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी 30.7 च्या सरासरीने आणि 9.36 च्या इकॉनॉमी रेटने अर्जुनने तीन बळी घेतले.

पुस्तकाच्या प्रकाशनावेळी माध्यमांशी बोलताना सचिन म्हणाला की, “अर्जुनचा सराव व्हावा यासाठी मी तसेच वातावरण तयार करणार आहे, जे माझ्या बालपणी तयार करण्यात आले होते.” आपण सर्वजण जाणून आहोत की, सचिनच्या करिअरच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने मोठी भुमिका बजावली आहे. सचिनने अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठांवर याचा उल्लेख केला. शनिवारी सचिनने त्याच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एक नाही तर स्वतःशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या.

अर्जुन बद्दल केला मोठा खुलासा
अर्जुनने याच वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) करिअरला सुरुवात केली. लेफ्टी बॉलर अर्जुन मीडियापेक्षा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. पुढे बोलताना सचिन म्हणाला की, “मला माझ्या परिवाराकडून खेळासाठी पाठिंबा मिळाला आहे. मला येणाऱ्या प्रत्येक अडचणी अजित सोडवत होता. माझ्या वाढदिवशी माझा मोठा भाऊ नितीनने माझी पेटिंग देखील बनवली होती. तसेच, माझी आई LIC मध्ये काम करायची, आणि माझे वडील प्राध्यापक होते. माझ्या आई-वडिलांनी मला पुर्णपणे खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. मी सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे.

सचिनने स्वत:वर लिहिले पुस्तक
सचिनने (Sachin Tendulkar) स्वत:वर लिहिलेल्या ‘स्किन्टिलेटिंग सचिन’ (Scintillating Sachin Book) या पुस्तकाच्या प्रकाशना प्रसंगी मुलगा अर्जुनबद्दल सांगितले की, तो अर्जुनला (Arjun Tendulkar) त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतो. पुढे बोलताना सचिन म्हणाला की, अर्जुनसाठी तसेच वातावरण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची स्तुती करता तेव्हा लोकही तुमची स्तुती करतात. माझे वडील म्हणायचे की तू तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर आणि आता मी अर्जुनला तेच सांगतो आहे.

सचिन म्हणाला की, “जेव्हा मी खेळापासून दुरावलो तेव्हा मीडियाने माझे अभिनंदन केले. तशीच अर्जुनला आवश्यक जागा द्या आणि त्याला खेळाच्या प्रेमात पडू द्या, असे आवाहन मी माध्यमांना केले आहे. याबद्दल मी मीडियाचे आभार मानतो. तसेच, आपल्या आईबद्दल बोलताना तेंडुलकर आपल्या बालपणात घडलेल्या गोष्टींवरून भावूक झाला. यासोबतच सचिनने शस्त्रक्रिया न होण्यामागे पत्नी अंजलीची (Anjali Tendulkar) महत्त्वाची भूमिकाही यावेळी सांगितली.”

पुढे सचिन म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मला अनेक दुखापती झाल्या. अशा परिस्थितीत मी दोन्ही पायांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. पण अंजलीने ऑस्ट्रेलियामध्ये येऊन शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला. सामन्यावेळी दुखापतींमुळे मला खूप त्रास झाला, पण अशा वेळी अंजलीने माझी काळजी घेतली.” पुस्तकाच्या प्रकाशनावेळी सचिनने कुटुंबातील प्रत्येकाबद्दल बोलत सर्वांचे आभार मानले. याचवेळी त्याने अर्जुनला खेळामध्ये प्रगती करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! पहिल्या दोन ऍशेस सामन्यांसाठी इंग्लंड संघाची घोषणा, अँडरसन ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धोका
मैदान गाजवलं! ओली पोपचे वेगवान द्विशतक, मायदेशातील 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---