श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतली. जयसूर्याने एक फोटो ट्विट करून या भेटीची माहिती दिली. जयसूर्याने नुकतेच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात राष्ट्रपती भवनाबाहेर झालेल्या आंदोलनात सहभागी होऊन सरकारचा उघडपणे विरोध केला होता आणि राष्ट्रपतींना पायउतार होण्याचे आवाहन केले होते. यानंतर राजपक्षे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
https://twitter.com/Sanath07/status/1561269845324206080?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1561269845324206080%7Ctwgr%5Eb39eec103f75540bc4f4b7a77fcc8693ced24435%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-former-sri-lanka-captain-sanath-jaysuriya-meets-bcci-secretary-and-acc-chairman-jay-shah-4487254.html
जयसूर्याने सांगितले की बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्या भेटीदरम्यान श्रीलंका क्रिकेटशी संबंधित अनेक मुद्द्यांवर त्यांनी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर श्रीलंकेत निर्माण झालेली परिस्थिती पाहता क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बीसीसीआय काही मोठे पाऊल उचलू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत एकुण १६० खेळाडू सहभागी