भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ रविवारी (३१ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकात एकमेकांसमोर आसणार आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने भारतीय संघाला एक मोलाचा सल्ला दिला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराज सध्या त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे आणि भारतीय संघाला बुमराहकडून खूप अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर मुथय्या मुरलीधरनने भारतीय संघाला हा सल्ला दिला आहे.
मुरलीधरनच्या मते संघाने बुमराहवर जास्त अवलंबून राहिले नाही पाहिजे आणि एक संतुलन शोधले पाहिजे. मुरलीधरनने आयसीसीसाठी लिहिलेल्या त्यांच्या कॉलममध्ये संघाला हा मोलाचा सल्ला दिला आहे.
भारतीय संघाला विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एकही विकेट घेता आली नव्हती. त्याव्यतिरिक्त भारताने या सामन्यात तीन वेगवान गोलंदाजांना खेळवले होते. अशात मुरलीधरनच्या मते कर्णधार विराट कोहली रविंचंद्रन अश्विनला संघात सामील करू शकत होता. तसेच हार्दिक पंड्याकडून काही षटकेही टाकून घेता येऊ शकतात.
मुरलीधरनने म्हटले की, “गोलंदाजी संबंधात मला ज्या संघाची चिंता आहे, तो भारत आहे. जसप्रीत बुमराह सामना जिंकवणारा खेळाडू आहे, पण गोलंदाजीमध्ये ते त्याच्यावर अती अवलंबून दिसतात. ते संघात एक लेग स्पिनर खेळवू शकतात किंवा रविचंद्रन अश्विन आहे. यामुळे दोन वेगवान गोलंदाजांसह गोलंदाजीसाठी हार्दिक पंड्यावरही अवलंबून राहता येऊ शकते”
मुरलीधरनने पुढे बोलताना पाकिस्तान संघ सध्या मजबूत स्थितीत असल्याचे सांगितले. “हे फक्त बुमराहवर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा योग्य संतुलन शोधणे आहे. जोपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये असण्याची गोष्ट आहे, तर मला वाटते की पाकिस्तान संघ चांगला दिसत आहे. कारण, त्यांनी त्यांच्या ग्रुप मधील दोन मजबूत संघ भारत आणि न्यूझीलंडला पराभूत केले आहे. त्यांच्याकडे प्रतिभा आहे, जी पहिल्यापासून राहिली आहे. पण वेस्ट इंडीजप्रमाणेच मागच्या काळात त्यांच्यासाठी काही खराब दिवस राहिले आहेत, ज्यामध्ये ते खूप खराब खेळले आहेत.” असेही मुरलीधरने म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझमची विराट कोहलीला टक्कर! आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ‘या’ विक्रमाच्या यादीत साधली बरोबरी