---Advertisement---

बड्या दिलाचा माणूस! विश्वचषक विजेता क्रिकेटर पेट्रोल पंपावर वाटतोय चहा, कारण कौतुकास्पद

On: सोमवार, जून 20, 2022 1:10 PM
Roshan-Mahanama
---Advertisement---

श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशात देशातील जनतेला जेव्हा मदतीची गरज आहे, तेव्हा अनेकजन त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. श्रीलंकेच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेले रोशन महानामा हेदेखील स्वतः पेट्रोल पंपावर लोकांना गरजेच्या आणि खायच्या वस्तू वाटताना दिसत आहेत.

रोशन महानामा (Roshan Mahanama) पेट्रोल पंपावर स्वतःच्या हाताने रांगेत उभ्या असलेल्या लोकांसाठी चहा घेऊन जात आहेत. एवढेच नाही त्यांनी लोकांच्या गरजेच्या इतर वस्तूही वाटल्या आहेत. ट्वीटर खात्यावरून त्यांनी एक खास पोस्ट करून याविषयी माहिती दिली. त्यांनी ज्या पद्धतीने लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, ते पाहून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.

महानामांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “आम्ही वार्ड प्लेस आणि विजेरामा मावथाच्या आसपासच्या पेट्रोल पंपांवर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना जेवण पुरवण्याचे काम केले. या रांगा दिवसेंदिवस लांब होत चालल्या आहेत. रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांचे आरोग्य बिघडत आहे. कृपया इंधनासाठी लागलेल्या रांगांमध्ये एकमेकांची देखभाल करा. एकमेकांना मदत करा.”

दरम्यान, आर्धिक संकटामुळे श्रीलंका देशाकडे एवढेही पैसे शिल्लक नाहीत, जेणेकरून त्यांना विदेशातून आवश्यक असलेले इंधन खरेदी करता येईल. पेंट्रोल आणि डिझेलचा शिल्लक असलेला स्टॉक येत्या काही दिवसात संपणार असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणास्तव पेट्रोल पंपांवर लोकांची गर्दी दिसत आहे.

रोशन महानामांच्या कारकिर्दीचा विचार केला, त्यांनी श्रीलंका संघासाठी एकूण ५२ कसोटी आणि २१३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४ शतक आणि ११ अर्धशतकांच्या मदतीने २५७६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ४ शतक आणि ३५ अर्धशतकांच्या मदतीने ५१६२ धावा केल्या आहेत. सन १९९६ साली श्रीलंका संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. त्या संघात महानामांचा देखील समावेश होता. त्यानंतर १९९९ विश्वचषक खेळून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

आयर्लंड दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सना दिली मोठी भेट, वाचा सविस्तर

‘सिक्सर किंग’ युवराजने मुलाचे ठेवले हटके नाव, चाहत्यांना दाखवली लाडक्याची झलक; पाहा गोंडस PHOTO

विचारही केला नव्हता, ८ महिन्यांत ६ कर्णधारांसोबत काम करावे लागेल; द्रविडने सांगितला अनुभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---