27 जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 2 ऑगस्ट पासून एकदिवसीय मालिका खेळली जाईल. मात्र त्यापूर्वी श्रीलंकेतून एक वाईट बातमी समोर आली आहे.
श्रीलंका अंडर 19 संघाचा कर्णधार राहिलेला धम्मिका निरोशन याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. निरोशन वर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्याता त्याचा जीव गेला. या हल्ल्यामागचं कारण अद्याप उघड झालेलं नाही.
पोलिसांनी सांगितलं की, माजी अंडर 19 क्रिकेटपटू धम्मिका निरोशन उर्फ ‘जोंटी’ (41) याची काल रात्री (16 जुलै) अंबलगोंडा येथील कांदेवत्ते येथे त्याच्या निवासस्थानाजवळ गोळी झाडून हत्या करण्यात आली. निरोशन वर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तो त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत होता. हल्लेखोरानं 12 बोरच्या बंदुकीतून निरोशनवर गोळी झाडली. पोलीस अद्याप संयशित आरोपीला शोधू शकलेले नाही. तपास जारी आहे.
धम्मिका निरोशन यानं 2000 मध्ये श्रीलंका अंडर 19 संघासाठी पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2002 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात त्यानं श्रीलंकेचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघानं ग्रुप स्टेज मध्ये 7 गुण घेत सुपर लिग मध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र त्यानंतर संघाला ग्रुप 1 मध्ये भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे श्रीलंका संघाचं सेमिफायनलमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं.
धम्मिका निरोशन श्रीलंकेच्या वरिष्ठ संघात कधी स्थान मिळवू शकला नाही. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळला, मात्र तिथेही त्याची कारकीर्द फारशी मोठी राहिली नाही. निरोशननं 12 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 269 धावा केल्या आणि 13 विकेट घेतल्या. तसेच त्यानं 8 लिस्ट ए सामन्यांमध्ये 48 धावा आणि 5 विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा मोठा खेळाडू! सामनावीर पुरस्कार केला चाहत्याला भेट; VIDEO एकदा पाहाच
पाकिस्तानातही बुमराहच्या नावाचा डंका! चिमुकल्याने केली बॉलिंग ऍक्शनची नक्कल, Video व्हायरल
बीसीसीआयचा नवा आदेश, स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य; या तीन जणांनाच सूट