---Advertisement---

निवड समितीसाठी टी20 मध्ये हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून का नको? मोठे कारण उघड

On: बुधवार, जुलै 17, 2024 10:55 AM
---Advertisement---

मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या टी20 मालिकेसाठी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची चर्चा होत आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने 2024 च्या टी20 विश्वचषकातील यशानंतर क्रिकेटच्या या लहान स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे. शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याकडे टी20 फॉरमॅटची कमान सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण बराच काळ रोहितच्या अनुपस्थितीत पांड्या संघाचे नेतृत्व करत होता, मात्र गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर आता कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव हा प्रमुख पर्याय मानला जात आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला टी20 फॉर्मेटमध्ये कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु त्याच्या फिटनेसशी संबंधित समस्या आणि वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता सूर्यकुमार यादवला हे महत्त्वाचे पद मिळू शकते. दुखापतीमुळे गेल्या वर्षभरात हार्दिकने अनेक मोठे सामने गमावले आहेत.

इतकंच नाही तर, रिपोर्टनुसार, गंभीर आणि आगरकरने काल (16 जुलै)संध्याकाळी हार्दिक पांड्याशी आगामी प्लॅन्सबद्दल चर्चा केली होती. दरम्यान, त्याने अनुभवी अष्टपैलू खेळाडूला सांगितले आहे की संघात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि दीर्घकालीन पर्यायाला अंतिम रूप देण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा विचार केला जात आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “हार्दिक पंड्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात उपकर्णधार होता. सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध आहे. आगामी दौऱ्यावर तो संघाचे नेतृत्व करणार होता, मात्र सध्या केवळ श्रीलंका दौऱ्यासाठीच नव्हे तर 2026 च्या विश्वचषकापर्यंत सूर्या टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे”.

महत्तवाच्या बातम्या-

“तो दिवस आठवून आज ही…”, कोहलीशी केलेल्या स्लेजिंगबबात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सांगितला किस्सा
मोहम्मद शमीचे मैदानात पुनरागमन! या मालिकेतून टीम इंडियासाठी करणार लवकरच कमबॅक
SL Vs Ind: भारताचा पुढचा टी20 कर्णधार म्हणून हार्दिक की सूर्या? लवकरच होणार घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---