तामिळनाडूचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे सामनाधिकारी डी.जे. गोकुलकृष्णन यांचे बुधवारी (11 ऑक्टोबर) वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी तमिळनाडूसाठी 12 वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन यांना गोकुळकृष्णन यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.
Absolutely shellshocked hearing the news coming out of chennai! Former FC cricketer, my U-17 & U-19 coach DJ Gokulakrishnan passes away. He was 51. He was a BCCI Match referee and I met him recently during the TNPL. Life is so unpredictable- prayers and strength to his family.… pic.twitter.com/aHbEOfz9TK
— Abhinav Mukund (@mukundabhinav) October 11, 2023
अश्विन याने तमिळनाडू रणजी संघात गोकुलकृष्णन यांच्यासोबत बराच वेळ घालवला होता. याशिवाय ते अश्विनचे पहिले गोलंदाजी प्रशिक्षकही होते. गुरुवारी अश्विनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याचा एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले,
“गोकुलकृष्णन हे एक अद्भुत व्यक्ती होते. आम्ही तमिळनाडू रणजी संघाच्या दौर्यावर शेअर केलेले सुंदर क्षण माझ्या आठवणीत कायम राहतील. माझे वाईट दिवस असताना मी ज्याच्याकडे जायचो असे ते पहिले व्यक्ती होते. डीजे गोकुळकृष्णन हे माझे पहिले गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि आता ते राहिले नाहीत, त्यामुळे मला धक्का बसला.”
मागील काही वर्षांपासून ते बीसीसीआय सोबत देशांतर्गत क्रिकेटमध्ये मॅच रेफ्री म्हणून देखील काम पाहत.
(Former Tamilnadu Cricketer DJ Gokul Krishnan Passed Away Ashwin Shared News)
महत्वाच्या बातम्या –
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाजला दुहेरी मुकुट
दुसऱ्या राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ, स्पर्धेत राज्यातील सुमारे १५० खेळाडू सहभागी