---Advertisement---

दुर्दैवी! वेस्टइंडीजच्या महिला संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या माजी गोलंदाजाचे कारच्या धडकेने निधन

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 6:04 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिजचा माजी जलदगती गोलंदाज इझ्रा मोझली यांचा कार अपघातात दुर्घटनेत मृत्यू झाला. ते ६३ वर्षांचे होते. ते सायकलवरून जात होते, त्यावेळी मागून येणाऱ्या एक कारने त्यांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती समोर येत आहे.

सन १९९० मध्ये मोझली यांनी इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळले होते. तसेच त्यांनी १९९०-९१ च्या काळात नऊ एकदिवसीय सामन्यांचे त्यांनी वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी सहा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी सात विकेट्स मिळवल्या. त्यापूर्वी त्यांनी सन १९८२-८३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. तथापि बंदी हटल्यानंतर ते पुन्हा परतले आणि इंग्लिश काउंटी संघ ग्लॅमरगॉनकडून देखील ते खेळले.

सन २०१६ मध्ये जेव्हा वेस्टइंडीजच्या महिला संघाने टी-२० विश्वचषक जिंकला होता, तेव्हा मोझली हे त्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते.

सन १९९० मध्ये इंग्लंड संघाचा कर्णधार ग्रॅहम गूच यांना मोझली यांनी घातक गोलंदाजी करत आपल्या चेंडूवर जखमी केले होते. ही गोष्ट मोझली यांचे जेव्हा जेव्हा नाव घेतले जाईल तेव्हा तेव्हा चर्चेत राहील. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व होते आणि मोझली यांच्या दोन चेंडूवरच गुच यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. या दुखापतीमुळे गूच तंबूत परतले आणि नंतर सामन्यातूनसुद्धा बाहेर पडले.

मोझली यांनी कसोटीत ६ आणि वनडेत ७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

BAN vs WI : पदार्पणवीर कायले मेयर्सचे अद्भुत द्विशतक, वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर संस्मरणीय विजय

द्विशतक एक विक्रम अनेक! वेस्ट इंडिजच्या काईल मेयरने मोठ्या पराक्रमांसह गाजवले पदार्पण

INDvENG 1st Test : पंत, पुजाराची अर्धशतकं, डॉम बेसच्या ४ विकेट्स; तिसऱ्या दिवसाखेर भारताच्या ६ बाद २५७ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---