---Advertisement---

“भारताची आक्रमक गोलंदाजी एका दिवसात तयार झाली नाही”

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2019 12:02 PM
---Advertisement---

सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) वेगवान गोलंदाजी आक्रमक आणि सर्वात मजबूत मानली जात आहे.

यामध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma), मोहम्मद शमी (Mohammed Shami), उमेश यादव (Umesh Yadav), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे वेगवान गोलंदाज गेल्या काही वर्षांपासून दमदार कामगिरी करत आहेत.

भारताच्या या वेगवान गोलंदाजीचे कौतुक करताना विंडीज क्रिकेट संघाचे माजी महान गोलंदाज इयान बिशप म्हणाले आहेत की भारताच्या वेगवान गोलंदाजीमध्ये सुधारणा एका रात्रीत झाली नाही. तर कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर खान यासारख्या लोकांचे यामध्ये योगदान आहे.

“सध्याच्या भारतीय वेगवान गोलंदाजीचे श्रेय कपिल देव यांना जाते. कपिलच्या काळात जा, त्यानंतर जवागल श्रीनाथ (Javagal Srinath), झहीर खान (Zahir Khan), मुनाफ पटेल (Munaf Patel), एस. श्रीसंत (S Sreesanth) यांनी वेगवान गोलंदाजीत सुधार आणला. ज्याचा उपयोग आता विराट कोहलीला (Virat Kohli) होत आहे,” असे इयान बिशप म्हणाले.

“कोहलीने विश्वास दाखवला आणि म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाज घातक ठरत आहे,” असेही बिशप म्हणाले.

त्याचबरोबर जुन्या विंडीज गोलंदाजांची आणि सध्याच्या भारतीय वेगवान गोलंदाजांची तुलना करणे बिशपला योग्य वाटत नाही. ते म्हणाले की, भारतीय वेगवान गोलंदाजांनी बाहेरील घडामोडींवर लक्ष न देता त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तेच योग्य असेल.

ते चांगली कामगिरी करत आहेत. तेव्हा अशी तुलना होणारच आहे. पण बिशप म्हणाले  त्यांना त्यापासून दूर रहायचे आहे.

तसेच बिशप यांंनी 21 वर्षीय वेगवान गोलंदाज उत्तर प्रदेशचा शिवम मावी (Shivam Mavi) आणि राजस्थानचा 19 वर्षीय कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti) यांना भारताच्या भविष्यातील एक उत्तम गोलंदाज म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---