क्रिकेट जगतासाठी 2022 हे वर्ष अनेक आनंदाच्या गोष्टी घेऊन आले. मात्र, या वर्षात काही निराशाजनक आणि दुःखद घटनाही घडल्या आहेत. या घटना अशा होत्या ज्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या चार दिग्गजांनी या वर्षात जगाचा निरोपही घेतला. आज आपण त्याच चार दिग्गजांविषयी जाणून घेणार आहोत.
शेन वॉर्न-
क्रिकेट विश्वातील सर्वकालीन महान फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न याचे नाव घेतले जाते. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत भल्याभल्या फलंदाजांना त्याने फिरकीच्या तालावर नाचवलेले. तसेच, प्रशिक्षक व समालोचक म्हणून देखील त्याची कारकीर्द उत्तम राहिली. 4 मार्च रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला. थायलंड येथे वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी मिळवणारा पहिला गोलंदाज होता.
ऍण्ड्रू सायमंड्स-
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक खेळाडू म्हणून ऍण्ड्रू सायमंड्स याचे नाव घेतले जाते. तो ऑस्ट्रेलियाच्या दोन विश्वविजेत्या संघांचा भाग होता. आक्रमक फलंदाजी व फिरकी गोलंदाजी करताना त्याने ऑस्ट्रेलियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. 14 मे रोजी एका रस्ते अपघातात त्याला आपले प्राण गमवावे लागले. मृत्यू समयी त्याचे वय केवळ 46 वर्ष होते.
रूडी कर्स्टन-
खेळाडू प्रमाणे चाहत्यांचे पंचदेखील आवडते असतात. क्रिकेटविश्वात नामवंत पंचदेखील अनेक आहेत. त्यापैकीच खेळाडू व चाहत्यांच्या आवडत्या पंचांपैकी एक असलेल्या रूडी कर्स्टन यांचादेखील रस्ते अपघातात मृत्यू झाला. 73 वर्षांच्या कर्स्टन यांच्या मृत्यूनंतर अनेक क्रिकेटपटूंनी हळहळ व्यक्त केली होती.
असद रौफ-
पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेट पंच असद रौफ यांनी देखील याच वर्षी आपला देह ठेवला. आपल्या कारकिर्दीतत नेहमीच वादग्रस्त राहिलेले रौफ, अलीकडच्या काळात क्रिकेट जगतापासून दूर होते. 66 वर्षांच्या रौफ यांचा हृदयविकाराच्या त्रासानंतर मृत्यू झाला.
(Four Cricket Related Person Died In 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट ते सेहवाग, ‘हे’ दिग्गज अपघातग्रस्त पंतसाठी चिंतेत; मोदीही म्हणाले, ‘या घटनेने मी…’
माणूस व्हा रे! रिषभच्या अपघातानंतर कार्तिकची लोकांना कळकळीची विनंती; म्हणाला…