लंडन। इंग्लंड आणि वेल्समधील 2019 विश्वचषकाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील पहिलाच सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात द ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 104 धावांनी विजय मिळवला.
याबरोबरच विजयाने 2019 विश्वचषकाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडकडून एक खास विक्रमही रचला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडच्या चार फलंदाजांनी अर्धशतके केली आहेत. त्यामुळे विश्वचषकात एका सामन्यात चार फलंदाजांनी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ होती.
इंग्लंडकडून या सामन्यात जेसन रॉय(54), जो रुट(51), कर्णधार इयान मॉर्गन(57) आणि बेन स्टोक्सने(89) या चार फलंदाजांनी अर्धशतके केली आहेत. यापूर्वी विश्वचषकाच्या एका सामन्यात इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा 5 वेळा केल्या आहेत. पण चार फलंदानी अशी कामगिरी करण्याची ही पहिली वेळ आहे.
या सामन्यात इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. त्यांचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला होता. पण नंतर या चौघांनी इंग्लंडचा डाव सावरला आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजी करताना 311 धावा उभारण्यात मोठा हातभार लावला.
इंग्लंडकडून रॉय आणि रुटने दुसऱ्या विकेटसाठी तर मॉर्गन आणि स्टोक्सने चौथ्या विकेटसाठी प्रत्येकी 106 धावांची भागीदारी रचली.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इम्रान ताहीर आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी 2 विकेट्स, तर अँडिल फेहलूकवायोने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका 39.5 षटकातच 207 धावांवर सर्वबाद झाली.
इंग्लंडकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच लियाम प्लंकेट आणि स्टोक्सने प्रत्येकी 2 तर आदिल रशीद आणि मोईन अलीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
इंग्लंडकडून विश्वचषकातील एका डावात केलेल्या सर्वाधिक 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी –
4 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओव्हल, 2019
3 विरुद्ध भारत, लॉर्ड्स, 1975
3 विरुद्ध पूर्व आफ्रिका, एजबस्टन, 1975
3 विरुद्ध श्रीलंका, पेशावर, 1987
3 विरुद्ध पाकिस्तान, कराची, 1996
3 विरुद्ध आयर्लंड, बंगळूरु, 2011
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सुपरमॅन बेन स्टोक्स! घेतला एका हाताने अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–गंभीर म्हणतो हे ४ संघ जाणार सेमीफायनलमध्ये
–युजवेंद्र चहलने चक्क प्रशिक्षक रवी शास्त्रींना टाकला बाउंसर, पहा व्हिडिओ





