आजपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसीच्या 12 व्या विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ काल साऊथँम्पटनला रवाना झाला आहे.
कार्डिफवरुन साऊथँम्पटनच्या या प्रवासादरम्यान भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांशी संवाद साधला आहे. या संवादाचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की चहलने भारताचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींशीही संवाद साधला आहे. या संवादारम्यान शास्त्रींनी त्यांच्या जून्या आठवणी सांगितल्या आहेत. ते चहलला सुरुवातीला गमतीने म्हणाले, ‘तूझे हिंदी खूप उच्च आहे, मला ते बाउंसर जात आहे. तू थोडं बम्बयीया हिंदीमध्ये बोल.’ तसेच पुढे मराठीत बोलताना म्हणाले, ‘मराठीमध्ये कायपण सांग’
त्यानंतर चहलने जेव्हा शास्त्रींना त्यांच्या प्रवासाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाला, ‘हा माझ्या घरच्यासारखा प्रवास आहे. मी 20 वर्षांपूर्वी आठवड्यातून चारवेळा या रस्त्यावर येत होतो. कारण मी वेल्समध्ये ग्लॅमॉर्गनकडून खेळत होतो. मी जेव्हा हा रस्ता पाहतो तेव्हा मला ते सर्व आठवते.’
यावर चहल त्यांना म्हणाला, ‘तूम्हाला तूमच्या तारुण्यातील दिवस आठवतात.’ त्यावर लगेचच शास्त्री त्याला म्हणाले, ‘तारुण्यातील नाही जूने दिवस, तरुण तर मी अजूनही आहे.’ शेवटी चहलने शास्त्रीचे संवाद साधल्याबद्दल आभार मानले. त्यावेळी शास्त्री चहलला म्हणाले, ‘तू भविष्यातील स्टार आहेस.’
चहलने शास्त्रीबरोबरच या प्रवासात फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फिटनेस ट्रेनर शंकर बासू, सहाय्यक क्षेत्ररक्षक प्रशिक्षक नुआन सेनेविरत्ने, मसाज ट्रेनर भाऊ, आणि अन्य सपोर्ट स्टाफ सदस्य ऋषी यांच्याशीही संवाद साधला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1133946132944576512
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या इयान मॉर्गनने केला मोठा पराक्रम
–तो एक विक्रम व्हायला १२ विश्वचषकांची पहावी लागली वाट
–जर विश्वचषकात संघांचे गुण सारखे झाले तर घेतला जाणार हा निर्णय






