क्रिकेट सामन्यांमध्ये आजपर्यंत अनेक रंजक घटना घडल्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. असेच काहीसे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग 2023 स्पर्धेत घडले आहे. या स्पर्धेत एक चेंडू पकडण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे, तीनही नव्हे, तर तब्बल 4 खेळाडू धावताना दिसले. यादरम्यानचा एक व्हिडिओ बीबीएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.
रविवारी (दि. 22 जानेवारी) बिग बॅश लीग 2023मधील 51वा सामना ब्रिस्बेन हीट विरुद्ध मेलबर्न स्टार्स (Brisbane Heat vs Melbourne Stars) संघात पार पडला. या सामन्यात ब्रिस्बेनने 4 धावांनी विजय मिळवला. मात्र, सामन्यादरम्यान अनोखा नजारा पाहायला मिळाला. ही घटना मेलबर्न स्टार्सच्या डावादरम्यान घडली. ब्रिस्बेनकडून तिसरे षटक टाकण्यासाठी मायकल नेसेर (Michael Neser) खेळपट्टीवर आला होता. तसेच, स्ट्राईकवर मेलबर्नचा फलंदाज थॉमस रॉजर्स (Thomas Rogers) होता.
यावेळी नेसेरने पहिलाच चेंडू रॉजर्सला टाकला, त्यावर डावखुऱ्या फलंदाजाने डाव्या बाजूला जोरदार फटका मारला. यावेळी हा चेंडू रोखण्यासाठी एक-दोन नाही, तर चार खेळाडू धावताना दिसले. विशेष म्हणजे, चारपैकी एका खेळाडूने चेंडू सीमारेषेला स्पर्श करण्यापूर्वीच रोखला. त्यामुळे रॉजर्सच्या खात्यात 3 धावा जोडल्या गेल्या. यादरम्यानचा खेळाडूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
How about this for fielding in numbers ????????@KFCAustralia #BucketMoment #BBL12 pic.twitter.com/MRH7EYHXak
— KFC Big Bash League (@BBL) January 22, 2023
सामन्याचा आढावा
या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 188 धावा केल्या होत्या. तसेच, मेलबर्न स्टार्सपुढे 189 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, मेलबर्न संघाला 20 षटकात 184 धावाच करता आल्या. त्यामुळे ब्रिस्बेन संघाने हा सामना 4 धावांनी खिशात घातला. मेलबर्न संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची आवश्यकता होती. स्पेन्सर जॉनसनच्या षटकात मार्कस स्टॉयनिस याने फक्त 9 धावा केल्या. या सामन्यात 41 चेंडूत 73 धावांची खेळी करणाऱ्या ब्रिस्बेनच्या सॅम हेन या फलंदाजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (four fielders race for ball in big bash league see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या दोनच दिवसात ‘रॉकस्टार’ जडेजा करतोय कमबॅक! शेवटच्या सामन्यात दिसणार मैदानावर
पाकिस्तान बोर्डाच्या माजी अध्यक्षांकडून गिलचं बारसं, रोहितवरून ठेवलं ‘हे’ नाव