वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १० गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. तसेच इंग्लंड संघाचे वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळण्याचे स्वप्नं अपूर्ण राहिले आहे. परंतु चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला तर, ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. यामुळे चौथा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या काही खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. त्याच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
चला तर पाहूया…
भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे ४ प्रमुख खेळाडू
रोहित शर्मा :
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने पहिल्या डावात अर्धशतकिय खेळी करत भारतीय संघाला १४५ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. त्याने ९६ चेंडूंमध्ये ११ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. तसेच पहिल्या विकेटसाठी त्याने शुबमन गिल सोबत मिळून ३३ धावांची भागीदारी केली. तसेच दुसऱ्या डावात ४९ धावांचा पाठलाग करत असताना, रोहित शर्मा आणि शुबमन गिलने एकही विकेट न गमावता भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
आर अश्विन :
कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या,आर अश्विनने या मालिकेत भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात २६ धावा देत ३ गडी बाद केले. तसेच दुसऱ्या डावात त्याने ४८ धावा देत ४ गडी बाद केले. दोन्ही डावात मिळून त्याने एकूण ७ गडी बाद केले. ४०० गडी बाद करण्यासोबतच तो सर्वात जलद ४०० गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. तसेच कपिल देव, अनिल कुंबले,हरभजन सिंग यांच्यानंतर अश्विनने ४०० गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.
अक्षर पटेल :
भारतीय संघासाठी अवघे २ कसोटी सामने खेळणाऱ्या अक्षर पटेलने दोन्ही सामन्यात भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षरने पहिल्या डावात ३८ धावा देत ६ गडी बाद केले होते. तसेच दुसऱ्या डावात ३२ धावा देत ५ गडी बाद केले. यासोबतच इंग्लंड संघाविरुद्ध दोन्ही डावात ५ गडी बाद करण्याचा विक्रम करणारा अक्षर पटेल चौथा गोलंदाज बनला. तसेच अक्षर दुसरा गोलंदाज बनला आहे, ज्याने आपल्या पहिल्या २ कसोटी सामन्यात ३ वेळेस ५ पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.
ईशांत शर्मा :
कसोटी कारकिर्दीतील आपला १०० वा सामना खेळत असलेल्या ईशांत शर्माने भारतीय संघाला सुरुवातीलाच पहिला विकेट मिळवून दिला. त्याने सुरुवातीलाच इंग्लंडचा सलामीवीर डोम सीबली याला बाद केले होते. यांनतर त्याला पूर्ण सामन्यात एकही विकेट मिळाला नाही. तरीही जास्त धावा खर्च न करता त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यात योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
ए बापू तारी बोलिंग कमाल छे..! विराट कोहलीची गुजराती ऐकून तुम्हीही खदखदून हसालं, पाहा व्हिडिओ
यजमानांपुढे पाहुणे २ दिवसांत चित; ‘ही’ आहेत इंग्लंडच्या पराभवाची तीन प्रमुख कारणे
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरची जुळी बहिण भारतात? सोशल मीडियावर चर्चेला उधान






