---Advertisement---

आनंदाचा क्षण! भारताकडून पदार्पण करणाऱ्या ४ खेळाडूंना मिळाली ‘या’ वरिष्ठांकडून कॅप, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जुलै 28, 2021 9:47 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध भारत संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (२८ जुलै) खेळला जात आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताकडून ४ खेळाडूंनी पदार्पण केले. या सर्व खेळाडूंना कॅप प्रदान करतानाचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

भारतीय संघात झाले मोठे बदल
टी२० मालिकेतील दुसरा सामना नियोजित कार्यक्रमानुसार २७ जुलै रोजी खेळवण्यात येणार होता. मात्र, भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या हा कोरोनाबाधित आढळल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आठ खेळाडूंना देखील क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे, भारतीय संघाला बुधवारच्या सामन्यासाठी संघात मोठे बदल करावे लागले. या सामन्यासाठी भारतीय संघाने एकूण ७ बदल आपल्या संघात केले. यामध्ये चार खेळाडूंनी टी२० पदार्पण केले तर कुलदीप यादव, राहुल चाहर व नवदीप सैनी यांनी संघात पुनरागमन केले.

या खेळाडूंनी केले पदार्पण
क्वारंटाईन व्हावे लागलेल्या खेळाडूंपैकी अधिकाधिक खेळाडू फलंदाज असल्याने भारतीय संघात तीन फलंदाज व एका गोलंदाजाला पदार्पणाची संधी देण्यात आली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी चमकदार कामगिरी करणारा महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड, कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल आणि दिल्लीचा नितीश राणा यांना टी२० पदार्पणाची संधी दिली गेली. सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याला देखील प्रथमच टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मिळाला.

पडिक्कल याला संघाचा कर्णधार शिखर धवन याच्याहस्ते, ऋतुराज गायकवाड याला संजू सॅमसन याच्या हातून तर, चेतन व राणा यांना संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार याच्या हस्ते कॅप दिली गेली.

दुसऱ्या टी२० साठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चाहर, नवदीप सैनी, चेतन साकारीया, वरुण चक्रवर्ती.

महत्त्वाच्या बातम्या – 

नव्या टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंना मोठा फायदा, तब्बल दहा स्थानांची उडी घेत चहल पोहोचला ‘या’ क्रमांकावर

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने ‘या’बाबतीत मोडले सारे विक्रम

‘मग बीसीसीआय विराटला बाहेर बसणार का?’ ऑलिम्पिक खेळाडूंवर टीका करणाऱ्यांवर भडकला वीरधवल खाडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---