इंडियन प्रीमियर लीगची आवर्जून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, बंगळुरू, अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. मागील १३ हंगामात अनेक असे खेळाडू होऊन गेले ज्यांनी या स्पर्धेत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
एकीकडे क्रिस गेल आणि एबी डीवीलियर्स यांसारख्या फलंदाजांनी आयपीएल कारकिर्दीमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. तर असे ही काही फलंदाज आहेत, ज्यांना आयपीएलच्या १३ हंगामात एकही षटकार मारता आला नाही.
१) आकाश चोपडा :
सध्या क्रिकेटमध्ये समलोचकाची भूमिका पार पाडणाऱ्या आकाश चोपडाला, आयपीएल २००८-०९ मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. चोपडाने आयपीएलमध्ये एकूण ७ सामने खेळले यात त्याने अवघ्या ५३ धावा केल्या. यात त्याला एकही षटकार मारता आला नाही.
२) नितीन सैनी:
२००७ मध्ये हरियाणा क्रिकेट संघासाठी पदार्पण करणाऱ्या नितीन सैनीने आतापर्यंत एकूण ५४ टी-२० सामने खेळले आहेत. ३२ वर्षीय सैनीला २०१२ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आपल्या संघात स्थान दिली होते. त्या हंगामात सैनीला एकूण १० सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने एक अर्धशतकिय खेळी करत १४० धावा कुटल्या होत्या. परंतु त्याला एकही षटकार मारण्यात यश आले नाही.
३) इशांक जग्गी :
झारखंड क्रिकेट संघासाठी २००८ मध्ये पदार्पण करणाऱ्या इशांक जग्गी याने देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये झारखंड संघासाठी ६५ टी-२० सामने खेळत एकूण १६०७ धावा केल्या आहेत. त्याला आयपीएलमध्ये अवघे ७ सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने एकही षटकार न लगवता अवघ्या ७७ धावा केल्या. तो २०१२ पासून ते २०१७ पर्यंत आयपीएल स्पर्धेत सहभागी होता.
४) शोएब मलिक :
पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू, शोएब मलिक देखील आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली संघाकडून खेळला होता. त्याने २००८ मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात एकूण ७ सामने खेळले होते. यात त्याने एकही षटकार न लगावता ५२ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का मंडळी! शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे लईच देखणी, लाईमलाईटपासून ठेवते स्वत:ला दूर
आयसीसी महिला टी२० क्रमवारीत शेफाली वर्माची प्रगती, तर ‘या’ भारतीय खेळाडूंची घसरण
अबब! वनडेत २३१ च्या फलंदाजी सरासरीने कुटल्या धावा, ‘ही’ खेळाडू यंदा ठरली ‘प्लेअर ऑफ द मंथ’