---Advertisement---

पदार्पणाच्या सामन्यातच टीम इंडियाला नडणाऱ्या जेमिसनने केला विश्वविक्रम

On: रविवार, फेब्रुवारी 23, 2020 9:19 AM
---Advertisement---

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. आज(23 फेब्रुवारी) या सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली आहे.

या डावात न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू काईल जेमिसनने 44 धावांची खेळी करत एक खास विक्रम केला आहे.

या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेमिसनने पहिल्याच डावात 45 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 4 षटकार मारले. त्यामुळे त्याने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजी करताना पहिल्याच डावाच 4 षटकार मारण्याच्या मायकल क्लार्कच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

क्लार्कने 16 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2004 मध्ये बंगळुरु येथे भारताविरुद्धच कसोटी पदार्पण करताना पहिल्या डावात 4 षटकारांसह 151 धावांची खेळी केली होती.

एवढेच नाही तर 6 फूट 8 इंच उंची असणाऱ्या जेमिसनने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च धावा करण्याचाही विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करताना ग्रॅहम विवियन यांचा 55 वर्षे जूना विक्रम मोडला आहे. त्यांनी 1965 ला भारताविरुद्धच कोलकाता येथे कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 43 धावांची खेळी केली होती.

सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात जेमिसनने कॉलिन डी ग्रँडहोमबरोबर 8 व्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारीही रचली. तसेच त्याआधी त्याने या सामन्यात भारताविरुद्ध पहिल्या डावात 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

या सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपुष्टात आला आहे.

#कसोटीत पदार्पणाच्या डावात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

4 – मायकल क्लार्क – विरुद्ध भारत, बंगळुरु, 2004 (151 धावा)

4 – काईल जेमिसन – विरुद्ध भारत, वेलिंग्टन, 2020 (44 धावा)

#न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 9 व्या क्रमांकावरील सर्वोच्च धावा –

44 – काईल जेमिसन – विरुद्ध भारत, वेलिंग्टन, 2020

43 – ग्रॅहम विवियन – विरुद्ध भारत, कोलकाता, 1965

41 – ब्रुस मार्टिन –  विरुद्ध इंग्लंड, डुनेडिन, 2013

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---